WPL Season 1 Winner: मुंबईच्या पोरींनी मैदान मारले, पहिल्या महिला आयपीएलवर कोरले नाव, दिल्लीच्या पदरी निराशा
WPL Season 1 Winner : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर नाव कोरले.
WPL Season 1 Winner : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर नाव कोरले. सेविर ब्रंट हिने मोक्याच्या क्षणी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने जेतेपदाला गवसणी घातली. दिल्लीने दिलेले 132 धावांचे आव्हान मुंबईने सात विकेट राखून सहज पार केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाली मुंबई संघाने इतिहास रचला. पहिल्या वहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर त्यांनी नाव कोरले. या स्पर्धेत मुंबईकडून गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी पाहायला मिळाली. वुमन्स प्रिमीयर लिगमधील आघाडीच्या पाच गोलंदाजात मुंबईच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. तर फलंदाजीतही मुंबईच्या खेळाडूंचा बोलबला राहिला. केर, ब्रंट आणि मॅथ्यूज यांनी संपूर्ण हंगामात अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले.
दिल्लीने मुंबईला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. पण मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फंलदाज हेली मॅथ्यूज 143 आणि यात्सिका भाटिया 4 धावा काढून तंबूत परतल्या. 23 धावांत मुंबईला दोन मोठे धक्के बसले होते. पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सेविर ब्रंट यांनी मुंबईचा डाव सावरला. दोंघांनी मुंबईला विजयाकडे नेले. पण मोक्याच्या क्षणी हरमनप्रीत धावबाद झाली. मुंबईच्या अडचणी वाढणार असे वाटत होते. पण ब्रंट हिने विस्फटोक फलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला. ब्रंट हिला अॅमिला केर हिने 14 धावा काढत चांगली साथ दिली. ब्रंट हिने नाबाद 60 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ब्रंट हिने सात चौकार लगावले. तर केर हिने दोन चौकार मारले. ब्रंट हिचे अर्धशतक आणि हरमनप्रीतची निर्णायाक खेळीच्या बळावर मुंबईने दिल्लीने दिलेले आव्हान तीन चेंडू आणि सात विकेट राखून पार केले.
दरम्यान, दिल्लीची कर्णधान मेग लॅनिंग हिने नाणेफिक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक दिल्लीला धक्के दिली. दिल्लीची अवस्था अतिशय बिकट झाली होती. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतले होते. अवघ्या 80 धावांत दिल्लीचे 7 विकेट गेल्या होत्या. 87 धावांत दिल्लीचे नऊ फलंदाज माघारी परतले होते. पण शिखा पांडे आणि राधा यादव यांनी विस्फोटक फलंदाजी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. दहाव्या विकेटसाठी दोघांनी चार धावा जोडल्या. शिखा पांडे 27 नाबाद राहिली तर राधा यादव हिने 27 नाबाद 27 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार मेग लॅनिंग हिने 35 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकून इस्सी वोंग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर ए केर हिने दोन फलंदाजांना तंबूत धाडले.