एक्स्प्लोर

CSK vs RR Playing 11 : चेन्नईचा विजय की राजस्थानची बाजी? खेळपट्टी आणि प्लेईंग 11 बद्दल सर्व माहिती एका क्लिकवर

CSK vs RR, Chidambaram Stadium Pitch Report : आयपीएल 2023 मध्ये 12 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत आहे.

Chennai Super Kings vs Rajasthan Royals : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या (IPL 2023) 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत. आयपीएलच्या चालू हंगामात या दोन संघांमधील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) सामना रंगणार आहे. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात हा सामना रंगणार आहे.

RR vs CSK IPL 2023 : चेन्नई आणि राजस्थान आमने-सामने

चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल 2023 गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून 5 विकेट्सने पराभवासह मोसमाची सुरुवात केली. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने लखनौ सुपर जायंट्सला 12 धावांनी पराभूत केले आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत केलं. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर 72 धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर पंजाब किंग्सला 5 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर राजस्थानेन दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव केला.

CSK vs RR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR vs CSK) यांच्यात 12 एप्रिल रोजी बुधवारी रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो. 

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

IPL 2023, CSK Playing 11 : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, सिसांडा मंगाला, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), राजवर्धन हंगेरगेकर, तुषार देशपांडे

IPL 2023 RR Playing 11 : राजस्थान संभाव्य प्लेईंग 11

यशस्वी जैस्वाल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा

महत्त्वाच्या इतर बातम्या :

CSK vs RR, Match Preview : चेन्नई की राजस्थान, कोण ठरणार वरचढ? पाहा हेड टू हेड आकडेवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Embed widget