एक्स्प्लोर

Tushar Deshpande IPL : आयपीएल 2008 मध्ये होता बॉल बॉय होता, 2023 मध्ये ठरला पहिला इम्पॅक्ट प्लेयर; मराठमोळ्या तुषार देशपांडेची कहाणी जाणून घ्या..

Who is Tushar Deshpande : आयपीएल 2008 मध्ये तुषार देशपांडेने बॉल बॉय म्हणून काम केलं. यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये तो पहिला इम्पॅक्ट प्लेयर ठरला. कोण आहे तुषार देशपांडे जाणून घ्या.

Tushar Deshpande in IPL : सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 16 वा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये अनेक नवे चेहरी आणि त्यांची चमकदारी कामगिरी पाहायला मिळत आहे. नवीन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत संघात खास स्थान मिळवलं आहे. मराठमोळा तुषार देशपांडे हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा महत्त्वाचा भाग आहे. 16व्या मोसमात तुषार देशपांडे चेन्नई संघाचा (CSK) आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. तुषार देशपांडेचा आयपीएलपर्यंतचा प्रवास कसा आहे. जाणून घ्या.

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सने तुषार देशपांडेला त्याच्या 20 लाखांच्या किंमतीला विकत घेतलं होतं. गेल्या मोसमात चेन्नई संघाने तुषारला केवळ दोन सामन्यांत खेळण्याची संधी दिली होती. ज्यामध्ये तो एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

चेन्नईकडून आतापर्यंत सर्वाधिक 5 विकेट

आयपीएल 2023 मध्ये, चेन्नई सुपर किंग्सने तुषार देशपांडेवर विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या संघात सामील केलं. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यापासून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलं. तुषार देशपांडे कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या अपेक्षेप्रमाणे खरा ठरला. त्याने 16 व्या मोसमात चेन्नईकडून आतापर्यंत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 31 धावांत 2 बळी घेतले, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

आयपीएलमध्ये आधी होता बॉल बॉय होता

2008 मध्ये खेळलेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात तुषार देशपांडे हा बॉल बॉय होता. त्यावेळी तुषार मुंबईच्या 13 वर्षांखालील संघाचा भाग होता. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात बॉल बॉय असताना त्याने सचिन तेंडुलकरसह जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना जवळून खेळताना पाहिलं.

2023 मध्ये ठरला पहिला इम्पॅक्ट प्लेयर

तुषार देशपांडे हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेयर (Impact Player) आहे. 31 मार्च रोजी, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 16व्या मोसमातील सलामीचा सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधार धोनीने अंबाती रायडूच्या जागी तुषार देशपांडेला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सामील केलं. चेन्नई संघाकडून फलंदाजी रायडू आणि गोलंदाजी तुषार देशपांडे यांनी केली.

2020 साली आयपीएलमध्ये पदार्पण

तुषार देशपांडेने आयपीएल 2020 मध्ये पदार्पण केलं. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक भाग होता. 2020 च्या आयपीएलमध्ये त्याने दिल्लीसाठी 5 सामने खेळले आणि तीन विकेट घेतल्या. यानंतर तुषार 2022 मध्ये तुषार चेन्नई (CSK) संघात सामील झाला.

मूळचा ठाण्याचा आहे तुषार देशपांडे

27 वर्षीय तुषार देशपांडे मूळचा महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी आहे. 2016-17 मध्ये त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 मध्ये, त्याने लिस्ट वन क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला. तुषार आयपीएलमध्ये दिल्ली आणि चेन्नईकडून खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई संघाकडून खेळतो. तो इंडिया ए आणि इंडिया ब्लू संघाकडूनही खेळला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

रोहितचा बोल्ड काढल्यानंतर तुषार देशपांडेने अपमान केला, CSK च्या गोलंदाजाचे स्पष्टीकरण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget