CSK vs PBKS Playing 11 : एमएस धोनी विरुद्ध शिखर धवन या स्टार खेळाडूंमध्ये लढत, 'हे' 11 किंग्स मैदानात; खेळपट्टी कशी आहे? जाणून घ्या...
IPL 2023 Match 41, CSK vs PBKS : आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supar Kings) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगणार आहे.
IPL 2023 CSK vs PBKS Playing 11 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज पहिला डबल हेडर सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supar Kings) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगणार आहे. चेन्नई संघाला गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे पंजाबलाही पराभवाची चव चाखावी लागली. शेवटच्या सामन्यात लखनौ संघाने पंजाबवर विजय मिळवला. महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वात चेन्नई संघ मैदानावर उतरेल. तर, पंजाबचा कर्णधार शिखर धवनही (Shikhar Dhawan) दुखापतीतून सावरल्यावर पुन्हा खेळताना दिसणार आहे.
CSK vs PBKS, IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आज, 30 एप्रिलला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पंजाब किंग्स (PBKS) विरोधात मैदानावर उतरणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर चेन्नई आणि लखनौकडील पराभवानंतर पंजाब आजचा सामना खेळणार आहेत. चेन्नई संघ आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे तर पंजाबची सहाव्या स्थानावर आहेत. चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमममध्ये आज दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं असल्यानं आज दोन्ही संघ विजय मिळवण्याचा आणि शर्यतीत परतण्याचा प्रयत्न करतील.
Chepauk Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.
CSK vs PBKS, Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
CSK Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, आकाश सिंह, महेश तीक्षणा.
PBKS Probable Playing 11 : पंजाब किंग्स
अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंह.