(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs LSG IPL 2024: धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
CSK vs LSG IPL 2024: सलामीवीर रचिन रवींद्र शून्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडही काही विशेष करू शकला नाही.
CSK vs LSG IPL 2024: लखनौ सुपर जायंट्सने (LSG) काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 8 विकेट्सने पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने सहज विजय मिळवला. लखनौकडून कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या या खेळीनं लखनौचा विजय सोपा झाला.
चेन्नईचं कुठे चुकलं?
संथ फलंदाजीचा चेन्नईला मोठा फटका बसला. चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर रचिन रवींद्र शून्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडही काही विशेष करू शकला नाही. संथ फलंदाजी हे चेन्नईच्या पराभवाचं एकमेव कारण होतं.रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावले आणि तो शेवटपर्यंत टिकला. त्याने 40 धावांत नाबाद 57 धावा केल्या.
चेन्नईचे मधल्या फळीतील फलंदाजही फ्लॉप ठरले. शिवम दुबे 8 चेंडू खेळत अवघ्या 3 धावा काढून बाद झाला. समीर रिझवीने 5 चेंडूत 1 धावा करत बाद झाला. सलामीवीर रहाणेबद्दल बोलायचे झाले तर त्याने 24 चेंडूत 36 धावा केल्या. धोनीने 9 गोलंदाजांमध्ये नाबाद 28 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. या खेळपट्टीवर 200 धावा असणं आवश्यक होतं. चेन्नईच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी आणखी काही धावा जोडल्या असत्या तर हा आकडा 200 धावांपर्यंत पोहोचू शकला असता.
सामना कसा झाला?
लखनौचा कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 षटकात 6 विकेट गमावत 176 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 40 चेंडूत 57 आणि महेंद्रसिंग धोनीने 9 चेंडूत 28 धावा केल्या. लखनौने 19 षटकांत 2 बाद 180 धावा करत सामना जिंकला. कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. निकोलस पूरन 12 चेंडूत 23 धावा करून नाबाद माघारी परतला आणि मार्कस स्टोइनिस 7 चेंडूत 8 धावा करून नाबाद परतला.
केएल राहुलचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय-
सामना संपल्यानंतर लखनौ आणि चेन्नईचे खेळाडूंनी हस्तांदोलन केले. यावेळी लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांची आधी भेट झाली. ऋतुराजच्या मागून एमएस धोनी येताच केएल राहुलने त्याच्या सन्मानार्थ लगेच आपली कॅप (टोपी) काढली आणि मग हस्तांदोलन केले. केएलने ज्येष्ठ खेळाडूचा अशा प्रकारे सन्मान केल्याने चाहते भारावून गेले आहेत. त्याचा हा हावभाव क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
संबंधित बातम्या:
सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!