एक्स्प्लोर

वर्ध्याच्या पट्ट्याला हार्दिकने दिली संधी, गुजरातकडून खेळणारा दर्शन नळकांडे आहे तरी कोण?

Darshan Nalkande : यश दयाल याच्या जागी विदर्भाच्या दर्शन नळकांडे याला संघात स्थान दिलेय.

CSK vs GT Qualifier 1: हार्दिक पांड्याने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्वालिफायर १  या मोक्याच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने मोठा बदल केला. हार्दिक पांड्याने यश दयाल याला प्लेईंग ११ मधून बाहेर बसवलेय. यश दयाल याच्या जागी विदर्भाच्या दर्शन नळकांडे याला संघात स्थान दिलेय.. यंदाच्या आयपीएलमध्ये दर्शन पहिलाच सामना खेळत आहे... मोक्याच्या सामन्यात दर्शन कशी कामगिरी करतोय... याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.

दर्शन नळकांडे याला २०१८ मध्ये पंजाब किंग्स संघाने विकत घतले होते.. पण त्याला प्लेईँग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. आज गुजरातच्या संघातून दर्शन याला खेळण्याची संधी मिळाली आहे. 

कोण आहे दर्शन नळकांडे?

विदर्भाचा वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडे याला गुजरात टायटन्सने २०२२ च्या लिलावात २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीत विकत घेतले होते. २०२२ च्या हंगामात गुजरातकडून दर्शन यान आयपीएलमध्ये पदार्पण केले.. गतवर्षी दर्शन याला दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. या दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या.  नळकांडे याचा जन्म चार ऑक्टोबर १९९८ रोजी वर्ध्यात झाला. दर्शन विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.  २०१९ मध्ये दर्शन याने हिमाचलप्रदेशविरोधात विदर्भाकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलेय.   आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दर्शन याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. 

दर्शनचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला आहेत. तर वकील असलेली त्याची आई अकोला विधी महाविद्यालयात व्याख्याता आहे. हे कुटूंब अकोल्यातील जठारपेठ भागात राहते. दर्शनची चारवेळा आयपीएलमध्ये निवड झाली. मात्र, यावेळी गुजरात संघातून त्याला प्रत्यक्ष खेळायला मिळेल अशी अपेक्षा त्याच्या पालकांना आहे. मागच्या वर्षीही दर्शन आणि अथर्वची आयपीएलमध्ये निवड झाली होती. मात्र, त्यांना खेळायची संधी मिळाली नव्हतीय. मात्र, यावेळी संधीचं सोनं करू असा विश्वास दर्शनला आहे.

दर्शनची आतापर्यंतची कामगिरी

दर्शन हा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्येही आपले योगदान देतो. विशेषकरुन शेवटच्या शटकांमध्ये चांगली फलंदाजीही करतो. दर्शनने 'मुश्ताक अली टी - 20' स्पर्धेत चार चेंडूत चार बळी घेतले होते. असा पराक्रम करणारा तो भारताचा दुसरा तर जगातला नववा गोलंदाज ठरला होता. मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत दर्शननं 13 बळी घेत टॉप 5 मध्ये स्थान पटकावले. गेल्या तीन वर्षांपासून दर्शन मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत टॉप 5 मध्ये आहे. या स्पर्धेत तीन वर्षांत दर्शनच्या नावावर 40 विकेट्सची नोंद.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget