CSK Fans : अहमदाबादच्या रस्त्यावर पिवळे वादळ, मोईन अलीने पोस्ट केला व्हिडीओ
IPL Final : चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा निकराने प्रयत्न करतील.
![CSK Fans : अहमदाबादच्या रस्त्यावर पिवळे वादळ, मोईन अलीने पोस्ट केला व्हिडीओ CSK vs GT Final IPL 2023 Chennai Super Kings Fans Narendra Modi Stadium Moeen Ali Shared Video- Watch CSK Fans : अहमदाबादच्या रस्त्यावर पिवळे वादळ, मोईन अलीने पोस्ट केला व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/29/1f5e350c2cb620e13d5121b00d5ad48c1685365536572582_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chennai Super Kings fans in Narendra Modi Stadium : धोनीची चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स थोड्याच वेळात मैदानात आमने सामने असतील. यंदाच्या मोसमात दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकतील. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा आयपीएल सामना ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा निकराने प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारलीय. आयपीएलच्या गत मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं..यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहिल. पण यंदा गुजरातसमोर चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईचं तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. पण त्यापूर्वी मोईन अली याने पोल्ट केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा सुरु आहे. अहमदाबादच्या मैदानावर यलो वादळ आल्याचे या स्टोरीवरुन दिसतेय. अहमदाबाद मैदानावर चेन्नईच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे.
चेन्नईचा संघ मैदानाकडे येत असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रस्त्यावर चेन्नईच्या चाहत्यांचा गराडा मोठ्या प्रमाणात होता. चेन्नईच्या बसला वाट मोकळी करुन देण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. चाहत्यांची गर्दी मोईन अली याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केली आहे. मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी दिसत आहे. रस्त्याच्या दोनी बाजूला पिवळे वादळ दिसत आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक मैदानात चेन्नईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. गुजरात, मुंबई, कोलकाता असो अथवा कोणतेही शहर... प्रत्येक शहरात चेन्नईच्या चाहत्यांची गर्दी उसंडली होती.
पाहा मोईन अली याचा व्हिडीओ
Chennai Super Kings fans in Narendra Modi Stadium. [Moeen Ali Instagram] pic.twitter.com/FBmKmAy3jy
— Johns. (@CricCrazyJohns) May 29, 2023
रविवारी IPLच्या अंतिम सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याला ब्रेक लागला. सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पण प्रेक्षकांचा प्रचंड हिरमोड झाला. मैदानात आलेल्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेकांनी परतीची तिकीट बूक केली होती.. काही जणांनी उघड्यावर रात्र काढली. बस स्टॉप, रेल्वे स्टेशनवर चाहत्यांची गर्दी झाली होती. रात्रभर चाहते स्टेशनवर झोपले. आता चाहते पुन्हा एकदा नव्या दमाने स्टेडिअमवर आपल्या आवडत्या खेळाडूला, संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडिअमवर परतले आहेत. स्टेडिअवर मोठी गर्दी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)