एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#CoronaVirus | आयपीएलची तिकीट विक्री होणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 9 झाली असून राज्यात आता एकूण 12 कोरोनाग्रस्त आहे. अशातच या सर्व कोरोनाग्रस्त रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात आयपीएल सामन्यांसाठी तिकीट विक्री होणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आयपीएलबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून कुठल्याही स्वरूपात गर्दी होऊ नये यासाठी आयपीएलची तिकीट विक्री होऊ नये, हा निर्णय करण्यात आला असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळणे, संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. आता महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रम होणार नाहीत. तसेच राजकीय सभा, मेळावे, धार्मिक यात्रा टाळाव्यात अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. आज विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व जिल्ह्याधिकारी बैठक घेतली. त्यात राज्यातील स्थितीचा आढावा घेतला गेला, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
#CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात आता 12 रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. याती 9 रुग्ण पुण्यातील, दोन मुंबई तर एक रुग्ण नागपूरमधील आहे. या सर्व रुग्णांची तब्येत बरी आहे. त्यांना आजार बळावलेला नाही, असंही टोपे यांनी सांगितलं.
#CoronaVirus | सॅनिटायझरचा तुटवडा, मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत आठपट मागणी वाढली
राज्यामध्ये तपासणीसाठी लॅब वाढवाव्यात यासाठी केंद्र सरकारशी बोललो आहोत. मुंबई आणि औरंगाबादला परवानगी दिली तर टेस्टिंग होऊ शकेल. राज्यातील तीन लॅब वर ताण वाढला आहे, असंही टोपे म्हणाले.
राज्यातील यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जी मुख्य शहरे आहेत तिथल्या टुर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. जे पर्यटक परतणार आहे त्यांनी स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये असा संदेश द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत म्हणून नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये. अधिकची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी केले.
Coronavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
करमणूक
राजकारण
Advertisement