प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
IPL 2024 Final KKR vs SRH : आयपीएल 2024 चा महाअंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये होत आहे.
IPL 2024 Final KKR vs SRH : आयपीएल 2024 चा महाअंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये होत आहे. चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर जेतेपदासाठी दोन्ही संघ भिडणार आहेत. कोलकाता आणि हैदराबाद दोन्ही संघाने विजयासाठी जोरदार तयारी केली आहे. चाहत्यांकडूनही आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा दिला जातोय. काही जणांनी फँटेसी अॅपवर प्लेईंग 11 तयार करत पैसे लावले आहेत. एका प्रसिद्ध रॅपरने आयपीएल फायनलवर कोट्यवधींचा सट्टा लावल्याचं समोर आलेय. कॅनेडियन रॅपर ड्रेक याने आयपीएल फायनल सामन्यावर कोट्यवधींचा डाव खेळला आहे. ड्रेक याने शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघावर लाखो डॉलरचा सट्टा लावला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाने ड्रेक होणार मालामाल -
कॅनडामधील प्रसिद्ध रॅपर ड्रेक याला अनेक ग्रॅमी अवार्ड मिळाले आहेत. त्यानं कोकात्याच्या विजयावर सट्टा लावलाय. सोशल मीडियावर त्याने याबाबतची पोस्ट टाकली आहे. ड्रेक याने कोलकाता नाईट रायडर्सच्या विजायवर 25 लाख अमेरिकन डॉलरचा सट्टा लावला आहे. चेपॉकवर हैदराबादचा पराभव झाल्याच ड्रेक मालामाल होणार आहे. ड्रेक याने याआधी फुटबॉल, बास्केटबॉल आणि रब्बी यासारख्या खेळावर मोठा सट्टा लावलाय, त्यासाठी तो अनेकदा चर्चेतही राहिलाय. रॅपर ड्रेक याने क्रिकेटवर पहिल्यांदाच सट्टा लावला आहे.
ड्रेक यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सट्टा लावल्याचं सांगितले. त्याने स्टेक डॉट कॉम वरील एक स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्यासोबत कोलकाता नाईट रायडर्स संघाची टॅगलाईन कोरबो लोरबो जीतबो असेही लिहिलेय. स्टेक डॉट कॉम ही एक ऑनलाइन क्रिप्टोकरेन्सी कसिनो आगेय. ज्याचा ब्रँड अँबेसरडर ड्रेक आहे.
हैदराबादविरोधात कोलकात्याचा शानदार रेकॉर्ड -
आयपीएल 2024 मध्ये कोलकात्याने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाताने स्पर्धेत वर्चस्व गाजवले. साखळी फेरीत कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये दोन वेळा आमनासामना झाला. त्या दोन्ही वेळा कोलकात्याने बाजी मारली. त्याशइवाय क्वालिफायर 1 सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेटने दारुण पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबादने आयपीएल 2024 हंगामात जबरदस्त कामगिरी केली. विशेखकरुन हैदराबादची फलंदाजी दमदार राहिली. आरसीबी आणि राजस्थानचा पराभव करत हैदराबादने फायनलमध्ये धडक मारली.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास विजेता कोण?
आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यातही पावसाने हजेरी लावली होती. यावेळी पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण झाला. त्याप्रमाणे या हंगामातही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असेल. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास सामना किमान 5 षटकांचा करण्याचा प्रयत्न केला जाईल. 5 षटकांचा सामना न खेळल्यास सुपर ओव्हरद्वारे निर्णय घेतला जाऊ शकतो. पावसामुळे सुपर ओव्हरचा खेळही न झाल्यास गुणतालिकेतील क्रमाच्या आधारे निर्णय घेतला जाईल.