Glenn Maxwell PBKS vs CSK IPL 2025 : चुकीला माफी नाही... सीएसके विरुद्ध सामन्यात असे काय घडले की BCCIने घेतली मोठी अॅक्शन, ग्लेन मॅक्सवेलला ठोठावला लाखोंचा दंड
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले.

BCCI punishes Glenn Maxwell : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. ज्यामुळे बीसीसीआयने मॅक्सवेलच्या मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून कापली आहे. यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. पंजाब किंग्जने हा सामना 18 धावांनी जिंकला. प्रियांश आर्यने 42 चेंडूत 103 धावांची खेळी खेळली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
While the exact nature of Glenn Maxwell's offence has not been made public by the IPL, a statement said that Maxwell "admitted to the Level 1 offence under article 2.2 (abuse of fixtures and fittings during the match) and accepted the match referee's sanction"… pic.twitter.com/iBmqTivsQz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 9, 2025
आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "मंगळवार रोजी नवीन चंदीगडमधील नवीन पीसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला एक डिमेरिट पॉइंटही मिळाला आहे. ग्लेन मॅक्सवेलने कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा मान्य केला आहे आणि मॅच रेफरीची शिक्षा स्वीकारली आहे. लेव्हल 1 च्या आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.
आयपीएल 2025 मध्ये ग्लेन मॅक्सवेल
ग्लेन मॅक्सवेलच्या बॅटने आयपीएल 2025 मध्ये अद्याप चांगली कामगिरी केलेली नाही, त्याने 3 डावात 31 धावा केल्या आहेत. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 30 धावा केल्या, तर गुजरात टायटन्सविरुद्ध तो आपले खातेही उघडू शकला नाही आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळलेल्या सामन्यात तो 1 धाव करून बाद झाला. पण, तो गोलंदाजीत चांगले योगदान देत आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत 3 बळी घेतले आहेत.
Some reflexes! 🔥💛
— Star Sports (@StarSportsIndia) April 8, 2025
A sharp caught & bowled by #RavichandranAshwin, & #GlennMaxwell’s stay is cut short!
Watch the LIVE action ➡ https://t.co/tDvWovyN5c#IPLonJioStar 👉 #PBKSvCSK | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/afhnaCAOnD
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जची कामगिरी या हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे, पहिले 2 सामने जिंकल्यानंतर त्यांनी तिसरा सामना गमावला आणि चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 18 धावांनी पराभव केला. 4 पैकी 3 विजयांसह पंजाब किंग्ज सध्या पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
हे ही वाचा -





















