IPL 2023 प्लेऑफ आणि फायनलची तारीख अन् ठिकाण ठरले, बीसीसीआयने केली घोषणा
IPL 2023 च्या प्लेऑफ आणि फायनलच्या तारखांची अन् ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे.
Indian Premier League : आयपीएलच्या सोळाव्या हंगमाताली प्लेऑफ आणि फायनल सामन्यांच्या तारखांची आणि ठिकाणाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयकडून ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, क्वालीफायर 23 मे रोजी होणार आहे. तर एलिमिनेटरचा २४ मे रोजी चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. तर दुसरा क्वालीफायर आणि फायनलता रनसंग्राम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. दुसरा क्वालीफायर २६ मे रोजी होणार आहे. तर आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा फायनल सामना २८ मे रोजी होणार आहे.
21 मे रोजी यंदाच्या हंगामातील अखेरचा साखळी सामना होईळ. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होणार आहेत. 23 मे रोजी चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये प्लेऑफचे दोन सामना आयोजित करण्यात आले आहेत. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असणाऱ्या संघामध्ये क्वालीफायर सामना होणार आहे. त्यानंतर पहिला एलिमिनेटर सामना होणार आहे. गुणतालिकेत तिसरा आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघात हा सामना होणार आहे. त्यानंतर दुसरा क्वालीफायरल सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यासोबतच या मैदानावर फायनलचा थरार रंगणार आहे. २८ मे रोजी आयपीएलचा फायनल सामना रंगणार आहे. २१ मे पर्यंत लीग सामने होणार आहेत. सध्या २८ सामने झाले आहेत.
प्लेऑफचे वेळापत्रक कसेय
TATA IPL 2023 Playoffs and final schedule |
||
Date |
Match |
Venue |
23-May-23 |
Qualifier 1 - Team 1 vs Team 2 |
चेन्नई |
24-May-23 |
Eliminator - Team 3 vs Team 4 |
चेन्नई |
26-May-23 |
Qualifier 2 - Winner of Eliminator vs Loser of Qualifier 1 |
अहमदाबाद |
28-May-23 |
Final - Winner of Qualifier 1 vs Winner of Qualifier 2 |
अहमदाबाद |
दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक पाहा....
सामना क्रमांक 30 (22 एप्रिल): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण लखनौ (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 31 (22 एप्रिल): मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 32 (23 एप्रिल): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण बेंगलोर (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 33 (23 एप्रिल): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 34 (24 एप्रिल): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 35 (25 एप्रिल): गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 36 (26 एप्रिल): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण बेंगलोर.
सामना क्रमांक 37 (27 एप्रिल): राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण जयपुर.
सामना क्रमांक 38 (28 एप्रिल): पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण मोहाली.
सामना क्रमांक 39 (29 एप्रिल): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण कोलकाता (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 40 (29 एप्रिल): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 41 (30 एप्रिल): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण चेन्नई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 42 (30 एप्रिल): मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 43 (1 मे): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 41 (2 मे): गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 45 (3 मे): पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण मोहाली.
सामना क्रमांक 46 (4 मे): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण लखनौ (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 47 (4 मे): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 48 (5 मे): राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण जयपुर
सामना क्रमांक 49 (6 मे): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण चेन्नई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 50 (6 मे): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 51 (7 मे): गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण अहमदाबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 52 (7 मे): राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण जयपुर.
सामना क्रमांक 53 (8 मे): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 54 (9 मे): मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 55 (10 मे): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 56 (11 मे): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 57 (12 मे): मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 58 (13 मे): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण हैदराबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 59 (13 मे): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 60 (14 मे): राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण जयपुर (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 61 (14 मे): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 62 (15 मे): गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 63 (16 मे): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 64 (17 मे): पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण धर्मशाला.
सामना क्रमांक 65 (18 मे): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 66 (19 मे): पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण धर्मशाला.
सामना क्रमांक 67 (20 मे): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण दिल्ली (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 68 (20 मे): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 69 (21 मे): मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 70 (21 मे): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण बेंगलोर.