MI Vs LSG: मुंबईचा संघ आज लखनौशी भिडणार; कधी, कसा आणि कुठे पाहणार सामन्याचा थरार?
MI Vs LSG, TATA IPL 2022: या हंगामात मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईच्या संघाला यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

MI Vs LSG, TATA IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ आज लखनौशी (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) भिडणार आहे. हा सामना आज दुपारी मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर (Brabourne Stadium) खेळला जाणार आहे. या हंगामात मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईच्या संघाला यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तर, केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात लखनौच्या संघानं पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. जर मुंबईच्या संघानं लखनौविरुद्ध सामना गमावल्यास त्यांचं प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं कठीण होऊ शकतो.
दरम्यान, प्रत्येक सामन्यात मुंबईच्या संघात बदल झाल्याचं पाहायला मिळालं.मुंबईच्या फलंदाजीची भिस्त पुन्हा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. त्यांना युवा डेवॉल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा यांची साथ लाभेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा चांगली कामगिरी करत आहे. मात्र, इतर गोलंदाज अपयशी ठरले आहेत. यामुळं आजच्या सामन्यात मुंबईचा संघ कोणत्या खेळाडूला संधी देईल हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
कधी आहे सामना?
आज 16 एप्रिल रोजी होणारा हा मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
