(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs GT: गुजरातला 6 चेंडूत 9 धावांची गरज, अखेरच्या षटकात मुंबईच्या डॅनियल सॅम्सनं कसा पलटवला सामना?
MI vs GT: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या 51 वा सामन्यातील गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली.
MI vs GT: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या 51 वा सामन्यातील गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. शेवटच्या षटकापर्यंत ताणलेला हा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी विजय झाला. या सामन्यातील अखेरच्या षटकात गुजरातच्या संघाला 9 धावांची गरज असताना मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सनं (Daniel Sams) भेदक गोलंदाजी केली. ज्यामुळं मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवता आला आहे. गुजरातच्या पराभवानंतर डॅनियल सॅम्सनं अखेरच्या षटकात कशी गोलंदाजी केली? यावर भाष्य केलं.
गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील अखरेच्या षटकातील थरार
गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियासारखे स्फोटक फलंदाज क्रीजवर उपस्थित होते. अशा स्थितीत गुजरातचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं अखेरच्या षटकात डॅनियल सॅम्सच्या हातात चेंडू सोपवला. या षटकातील पहिला चेंडू डॅनियलनं स्लो टाकला. या चेंडूवर मिलरला एकच धाव मिळाली. डॅनियलने दुसरा चेंडू वाइड ऑफ ऑफच्या बाहेर ठेवला, ज्यावर तेवतियाला एकही धाव घेता आली नाही. पुढच्या चेंडूवर तेवतियाने डीप-मिडविकेटवर शॉट खेळला. एक धाव सहज पूर्ण झाली पण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. आता शेवटच्या तीन चेंडूवर गुजरातला विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. डॅनियलच्या समोर राशिद खान होता. डॅनियलने हा चेंडूही बाहेर ठेवला, ज्यावर रशीद फक्त एक धाव घेऊ शकला. यानंतर डॅनियलनंच्या अखेरच्या दोन चेंडूवर मिलरला एकही धाव काढता आली नाही. अखेर मुंबईने हा सामना 5 धावांनी जिंकला.
मुंबईच्या विजयानंतर डॅनियल सॅम्स काय म्हणाला?
गुजरातविरुद्ध अखरेच्या षटकात भेदक गोलंदाजी करणारा डॅनियल सॅम मुंबईच्या विजयानंतर म्हणाला की, ' गुजरातला 6 चेंडूत फक्त 9 धावा हव्या होत्या. माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नव्हतं. कारण, सर्व आकडे फलंदाजांच्या बाजूनं जात आहेत. मी काही डिलिव्हरी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. मी माझे सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. या षटकात मी स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि मी यशस्वी ठरलो.
हे देखील वाचा-