एक्स्प्लोर

IPL 2024 SRH VS RR: हैदराबादचा विजय होताच काव्या मारन नाचू लागली; धावत जाऊन त्याला पहिले मिठी मारली, पाहा Video

IPL 2024 SRH VS RR  Qualifier 2: राजस्थानविरुद्धच्या विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. 

IPL 2024 SRH VS RR  Qualifier 2: आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा (RR) 36 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. 

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादने फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 175 धावा केल्या. हैदराबादकडून हेन्रिच क्लासेनने 34 चेंडूत 50 धावा केल्या. तर मॅथ्यू हेडने 28 चेंडूत 34 धावा केल्या. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि मॅथ्यू हेडला चांगली सुरुवात करता आली नाही. हैदराबादने 120 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर शाहबाज अहमद आणि क्लासेनने चांगली भागिदारी करत हैदराबादला 175 धावांवर पोहचवले. 

हैदराबादची फलंदाजी सुरु असताना संघाची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) नाराज असल्याची दिसून आली. 120 धावसंख्येवर 6 विकेट्स गमावल्यामुळे काव्या मारन टेन्शनमध्ये दिसत होती. मात्र दुसऱ्या डावात हैदराबादच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करत राजस्थानवर वर्चस्व ठेवले. संघाचे हे पुनरागमन पाहून मालकिण काव्या मारन आनंदाने नाचताना दिसली. हैदराबादचा विजय झाल्यानंतर काव्या मारनने प्रथम वडिलांना जाऊन मिठी मारली. 

विजयानंतर काव्याने काय केलं? (Celebrations from Kavya Maran after sealing the Final)

जेव्हा सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला तेव्हा संघाची मालकीण काव्या मारनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विजयानंतर  काव्याने मागे धावत जाऊन तिचे वडील कलानिधी मारन यांना मिठी मारली. हैदराबादने शेवटच्या वेळी 2018 च्या मोसमात अंतिम फेरी गाठली होती. 2016 मध्ये, सनरायझर्स हैदराबादने केवळ एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

राजस्थानचा डाव कसा होता?

176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. टोम कोडमोर फक्त 10 धावांवर बाद झाला. त्याने त्यासाठी 16 चेंडू खर्च केले. संजू सॅमसन यानेही 11 चेंडूत फक्त 10 धावाच केल्या. पॅट कमिन्स याने कोडमोर याला बाद केले, तर अभिषेक शर्माने संजूचा अडथळा दूर केला. रियान पराग 10 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतरही ध्रुव जुरेल याने एकाकी झुंज दिली. जुरेल याने 160 च्या स्ट्राईक रेटने शेवटपर्यंत झुंज दिली. जुरेल याने 35 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली.

संबंधित बातम्या:

IPL 2024 SRH VS RR  Qualifier 2: हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर तीन गोष्टींवर बोट ठेवलं...; संजू सॅमसमने कोणावर खापर फोडलं?

Team India Head Coach: स्टीफन फ्लेमिंगला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचे आहे? चेन्नईच्या CEO ने केला धक्कादायक खुलासा!

Hardik Pandya and Natasa Stankovic: हार्दिक पांड्या अन् नताशाचा घटस्फोट होणार?; 4 घडामोडींनी वेधलं लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget