Shane Watson on Mumbai Indians: ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन
Shane Watson on Mumbai Indians: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं सुरुवातीचे सहा सामने गमावले आहेत. ज्यामुळं मुंबईचं प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं थोडं कठीण मानलं जात आहे.
![Shane Watson on Mumbai Indians: ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन IPL 2022: Ishan Kishan, Jofra Archer poor picks, says Shane Watson Shane Watson on Mumbai Indians: ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/17/5e353c47201cf257c7e0060e7beb76bb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shane Watson on Mumbai Indians: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं सुरुवातीचे सहा सामने गमावले आहेत. ज्यामुळं मुंबईचं प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं थोडं कठीण मानलं जात आहे. दरम्यान, सलग सामने गमवल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपलं मत मांडून मुंबईच्या पराभवाचं कारण सांगतिलं आहे. यातच ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसननं मुंबईच्या संघानं ईशान किशनवर 15 कोटी खर्च करून सर्वात मोठी चूक केल्याचं म्हटलं आहे. तसेच जोफ्रा आर्चरलाही खरेदी करून मुंबईचा संघ संकटात सापडला आहे, असंही त्यानं म्हटलं आहे.
या हंगामात मुंबई इंडियन्सनं सहा सामने खेळले आहेत. मात्र, एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आला नाही. मुंबईच्या संघानं मेगा ऑक्शनपूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्डला संघात कायम ठेवलं होतं. त्यानंतर आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये ईशान किशनला 15.25 कोटीत खरेदी केलं. तर, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर 8 कोटींची बोली लावली. आर्चर अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही.
शेन वॉटसनने 'द ग्रेड क्रिकेटर' पॉडकास्टशी केलेल्या संभाषणात असं सांगितलं आहे की, "मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत तळाशी आहे. याबाबात मला काही वाटतं नाही, कारण आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं आश्रर्यकारक निर्णय घेतले आहेत. ईशान किशनला संघात सामील करण्यासाठी मुंबईनं 15 कोटी खर्च केले. ईशान किशन चांगला खेळाडू आहे. परंतु, त्याच्यावर इतके पैसे खर्च करायला नको होते. जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असतानाही मुंबईनं त्याच्यावर बोली लावली.तो गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट खेळला नाही. तो कधी दुखापतीतून सावरेल? याची कल्पना नसताना मुंबईनं त्याला आठ कोटीत खरेदी केलं. आयपीएलच्या ऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं काही चुकीचे निर्णय घेतले", असंही शेन वॉटसननं म्हटलंय.
हे देखील वाचा-
- Deepak Chahar: आयपीएलमधून बाहेर पडलेल्या दीपक चहरला 14 कोटी मिळणार का? येथे मिळवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर
- IPL 2022: आयपीएल आणि गर्लफ्रेन्डमध्ये पठ्ठ्यानं कोणाला निवडलं? मैदानावरील पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा
- Rahul Tripathi: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर घोंगावलं राहुल त्रिपाठी नावाचं वादळ, कोलकात्याच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडत रचले अनेक विक्रम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)