(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT vs LSG : राहुलच्या चूकांमुळे गुजरात विजयी, 'ही' आहेत लखनौच्या पराभवामागील पाच महत्त्वाची कारणं?
IPL : मुंबईच्या वानखेडे मैदानात झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स सामन्यात गुजरातने लखनौवर पाच विकेट्सने विजय मिळवला.
IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) या क्रिकेटच्या महाहंगामाला सुरुवात झाली आहे. सोमवारी लखनौ सुपरजायंट्स (LSG) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने 5 विकेट्सने सामना जिंकला. त्यामुळे हार्दीक पंड्याने पहिल्यांदाच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना आयपीएलमधील अनुभवी कर्णधार केएल राहुलला मात दिली. पण या सामन्यातील पराभवामागे राहुलच्याच काही चूका जबाबदार असून नेमक्या या चूका कोणत्या यावर एक नजर फिरवूया...
1. कोणत्याही सामन्यात संघाची सुरुवात अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे सलामीवीरांची जबाबदारी मोठी असते. त्यात लखनौकडून केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक हे सर्वात दमदार फलंदाज असून सलामीवीर म्हणून त्याला गुजरातविरुद्ध खास कामगिरी करता आली नाही. राहुल शून्यावर तर डी कॉक केवळ सात धावा करुन तंबूत परतला.
2. यानंतर केएल राहुलची आणखी एक चूक म्हणजे त्याने दुष्मंथा चमिरा याला गुजरातविरुद्ध दमदार गोलंदाजी करुनही त्याला संपूर्ण चार ओव्हर खेळवल्या नाहीत. त्याने तीन ओव्हरमध्ये 22 धावा देत 2 विकेट्स पटकावल्या. तरी त्याची आणखी एक ओव्हर राहुलने न घेतल्याने संघाला तोटा झाला असे म्हणता येईल.
3. गुजरात संघाचा डाव 15 ओव्हरपर्यंत लखनौच्या आवाक्यात होता. पण राहुलने 16 वी ओव्हर दीपक हुडाला दिली. या ओव्हरमध्ये राहुल तेवतिया आणि डेविड मिलरने 22 धावा केल्या. त्यामुळे संघाला मोठा फटका बसला.
4. त्यात लखनौमध्ये अनेक महत्त्वाचे खेळाडू नसल्याचा फटकाही संघाला बसला. यात मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर आणि कायल मेयर्स यांची नावं असून या साऱ्यांना पहिल्या सामन्यात खेळता न आल्याने संघाला मोठा फटका बसला.
5. लखनौच्या पराभवामागील आणखी एक मोठं कारण म्हणजे त्यांनी नाणेफेक गमावली. ज्यामुळे गुजरातने प्रथम गोलंदाजी घेतली. आतापर्यंत झालेल्या आय़पीएल 2022 च्या हंगामात एकही सामना नाणेफेक गमावणाऱ्या संघाने जिंकला नसून कालही हेच पाहायला मिळाले.
हे देखील वाचा-
- IPL 2022, SRH vs RR : राजस्थान विरुद्ध हैद्राबाद आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022: 'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध
- IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha