IPL 2022: मिलरनं मोडला रोहित-पोलार्डचा खास रेकॉर्ड! जाडेजाच्या विक्रमाशी बरोबरी, लवकरच धोनीलाही टाकणार मागं
Indian Premier League 2022: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे.
Indian Premier League 2022: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. धोनीनं एकूण सहावेळा आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. दरम्यान, डेव्हिड मिलरनं (David Miller) मंगळवारी खेळण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पाचव्यांदा अशी कामगिरी केली. या कामगिरीसह त्यानं रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कायरन पोलार्डसारख्या (Kieron Pollard) दिग्गजांचा विक्रम मोडला आहे. तर, रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) विक्रमाशी बरोबरी केली आहे. डेव्हिड मिलरचं आता धोनीचं विक्रम मोडण्याकडं लक्ष्य असेल.
डेव्हिड मिलरच्या जोरावर गुजरातची अंतिम फेरीत धडक
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सला अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. त्यावेळी प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारून डेव्हिड मिलरनं गुजरातला विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरातच्या संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यासाठी आज लखनौ- बंगळुरू यांच्यात सामना रंगणार
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ गुजरात टायटन्सशी अंतिम सामन्यात भिडेल. तर, पराभूत झालेल्या सघांचा प्रवास इथेच संपेल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार
यंदाच्या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळला जाणार आहे. गुजरात टायटन्सनं संपूर्ण हंगामात जबरदस्त प्रदर्शन करून दाखवलं आहे. यंदाच्या हंगाम गुजरातचा फलंदाज डेव्हिड मिलरसाठी चांगला ठरला आहे. या हंगामात 15 सामन्यात 64.14 च्या सरासरीनं आणि 141.19 च्या स्ट्राईक रेटनं 449 धावा केल्या आहेत. या हंगामात दोन वेळा डेव्हिड वार्नरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. या हंगामात त्यानं एकूण 22 षटकार मारले आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत नवव्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा-