एक्स्प्लोर

Cancel IPL Trending: 'आयपीएल रद्द करा!', दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) हंगामावर देखील आता कोरोनाचं सावट गडद होताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे (DC) फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांच्यानंतर आता एका खेळाडूलाही कोरोनाची लागण झाली आहे.

Covid-19 Hits IPL 2022 : दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे अनेक नियमांतंर्गत सुरु असलेली आयपीएल यंदा कुठे भारतात मर्यादीत प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडत होती. पण आता आयपीएलच्या या 15 व्या (IPL 2022) हंगामावर देखील कोरोनाचं संकट घोंगावत आहे. दिल्ली संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आता यंदाची आयपीएल रद्द करा अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात आयपीएल रद्द करण्याची मागणी करत असल्याने 'Cancel IPL' हा हॅशटॅगही ट्रेन्ड होताना दिसत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचे (DC) फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूला देखील कोरोनाची बाधा झाल्याने दिल्ली संघाने आगामी सामन्यासाठी पुण्याला जाणं रद्द केलं आहे. तसंच संपूर्ण संघाला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. क्रिकबज या वेबसाईटने याबाबत वृत्त दिलं असून संबधित खेळाडूची आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट देखील केली जाणार आहे. दरम्यान दिल्ली संघात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे बायोबबलमध्ये कोरोनाची एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान सामन्यांना प्रेक्षकांची देखील उपस्थिती असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढू नये यासाठी ही मागीणी नेटकरी करत आहेत. 


Cancel IPL Trending: 'आयपीएल रद्द करा!', दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी

कोरोनाच्या शिरकावामुळे मागील वर्षीही व्यत्यय

मागील वर्षी अर्थात 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 चा हंगाम 4 मे 2021 रोजी अर्ध्यातूनच थांबवावा लागला होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. 2021 मध्ये सनराइजर्स हैदराबाद (SRH) चा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित कऱण्यात आले होते. 2021 मध्ये 29 लीग सामने झाल्यानंतर बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने दुबईमध्ये खेळवले होते.   तर कोरोना महामारीमध्ये 2020 चा हंगामही दुबईत झाला होता.  

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget