एक्स्प्लोर

CSK Vs DC: मोईन अलीच्या फिरकीपुढं दिल्लीच्या संघाची दमछाक, चेन्नईचा 91 धावांनी विजय 

CSK Vs DC: चेन्नईकडून मोईन अली Moeen Ali),  सिमरजीत सिंह आणि मुकेश चौधरीनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. 

CSK Vs DC: चेन्नईच्या (Chennai Super Kings) भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची दमछाक झाली. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या (Devon Conway) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीसमोर 20 षटकात 209 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला. चेन्नईकडून मोईन अली Moeen Ali),  सिमरजीत सिंह (Simarjeet Singh), ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आणि मुकेश चौधरीनं (Mukesh Choudhary) उत्कृष्ट गोलंदाजी केली. 

चेन्नईच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली. दिल्लीच्या डावातील दुसऱ्याच षटकात डेव्हिड वार्नरच्या रुपात महेश तिक्षणानं दिल्लीला पहिला झटका दिला. डेव्हिड वार्नरनं 12 चेंडूत 19 धावा केल्या.  त्यानंतर श्रीकर भारतही स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, मोईन अलीनं मिचेश मार्श आणि ऋषभ पंतला बाद करून सामन्यावरील पकड मजबूत केली.त्यानंतर रिपाल पटेलला आऊट करून त्यानं सामना चेन्नईच्या बाजूनं झुकवला. मोईन अलीसह सिमरनजीत, मुकेश चौधरी, ड्वेन ब्राव्हो भेदक गोलंदाजी केली. या सामन्यात दिल्लीच्या कोणत्याही खेळाडूला 30 धावांचा आकडा गाठता आला नाही. ज्यामुळं दिल्लाचा 91 धावांनी पराभव झाला. चेन्नईकडून मोईन अलीनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, सिमरजीत, महेश तिक्षणा, आणि ड्वेन ब्राव्हो यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, महेश तिक्षणाला एक विकेट मिळाली.

नाणफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी चेन्नईकडून मैदानात आलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वेनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 110 धावांची भागेदारी केली. परंतु, अकराव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर नॉर्टीजेनं ऋतुराज गायकवाडला माघारी धाडलं. त्यानंतर शिवम दुबे मैदानात आला. या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर अंबाती रायडूही स्वस्तात माघारी परतला. चेन्नईचे तीन विकेट्स पडल्यानंतर कर्णधार धोनी मैदानात आला. परंतु, वीसाव्या षटकात नॉर्टीजेनं मोईन अली आणि रॉबिन उथप्पाला सलग दोन चेंडूत आऊट करून माघारी धाडलं. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीची छोटीशी आक्रमक खेळी केली. त्यानं आठ चेंडूत 21 धावांची खेळी केली.  ज्यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. दिल्लीकडून नॉर्टिजेनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, खलील अहमदनं दोन आणि मिचेश मार्शनं एक विकेट्स घेतली. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget