IPL 2022 : सात पराभवानंतरही चेन्नई प्लेऑफसाठी ठरु शकते पात्र, जाणून घ्या समीकरण
IPL 2022, Chennai Super Kings : यंदाच्या हंगामातील चेन्नईचा हा सातवा पराभव होता. या पराभवामुळे चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान खडतर झालेय. पण आशा संपलेल्या नाहीत.
IPL 2022, Chennai Super Kings : बुधवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 13 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील चेन्नईचा हा सातवा पराभव होता. या पराभवामुळे चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान खडतर झालेय. पण आशा संपलेल्या नाहीत. होय... दहा सामन्यात सात पराभवानंतरही चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतो... पाहूयात नेमकं समीकरण...
- चेन्नईच्या संघाला उर्वरित चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. चारही समाने जिंकले तर चेन्नईचे 14 गुण होतील... चेन्नईने उर्वरित चार सामने मोठ्या फरकाने जिंकल्यास नेट रनरेटमध्येही मोठी वाढ होईल..
- आरसीबीचा उर्वरित तीन सामन्यापैकी दोन पराभव आणि एक विजय गरजेचा आहे. म्हणजेच... आरसीबीचा गुजरात आणि पंजाबकडून मोठ्या फरकाने पराभव व्हावा... तसेच आरसीबीला सनरायजर्स हैदराबादला पराभूत करावे लागेल... अशात आरसीबीचे 14 मध्ये सात विजय होतील...
पंजाब किंग्स संघाचे उर्वरित चार सामन्यात दोन विजय आणि दोन पराभव... पंजाबचा राजस्थान आणि दिल्लीकडून पराभव.. तसेच आरसीबी आणि हैदराबादविरोधात मोठ्या फरकाने विजय....अशात पंजाबचेही 14 गुण होतील...
हैदराबाद संघाला उर्विरत पाच सामन्यात तीन पराभव आणि दोन विजय...हैदराबादचा पंजाब, आरसीबी आणि मुंबईकडून पराभव झाल्यास आणि दिल्ली आणि कोलकात्याचा पराभव केल्यास.... चेन्नईची संधी वाढेल... अशात हैदराबाद संघाचेही 14 सामन्यात 14 गुण होतील... हैदराबादचा नेटरनरेट चेन्नईपेक्षा कमी असावा...
दिल्लीच्या संघाचे पाच सामन्यात तीन विजय आणि दोन पराभव...चेन्नई आणि राजस्थानकडून पराभव... तसेच मुंबई, पंजाब आणि हैदराबादवर विजय...
KKR संघाचा उर्वरित एका सामन्यात पारभव झाल्यास अन् तीन सामने जिंकल्यास... चेन्नईची संधी वाढेल... म्हणजेच मुंबईविरोधात कोलकात्याचा पराभव व्हावा लागेल... तर लखनौविरोधात दोन आणि हैदराबादविरोधात एक सामना जिंकू अथवा पराभव होऊ... चेन्नईची संधी वाढेल...
जर वरील समीकरणे झाल्यास चेन्नईचा संघ लखनौ, गुजरात आणि राजस्थानसोबत प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतो...
इतर महत्वाच्या बातम्या:
- RCB vs CSK, Top 10 Key Points : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचा गुजरातविरुद्ध अफलातून षटकार; राशिदनं जाऊन चक्क लियामची बॅट तपासली, पाहा फोटो
- ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
- Dhawan IPL Record : शिखर धवनचा दमदार फॉर्म कायम, लवकरच नावे करणार नवा विक्रम