IPL 2023, KKR vs RR: कोलकात्याचा गाशा गुंडाळला, राजस्थानचे आव्हान जिवंत
IPL 2023, KKR vs RR : दिल्लीनंतर आता कोलकात्याचेही आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले
IPL 2023, KKR vs RR: दिल्लीनंतर आता कोलकात्याचेही आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. कोलकात्याला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय अनिवार्य होता. पण ईडन गार्डन्सच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने कोलकात्याचा पराभव केला. या पराभवामुळे कोलकाताचे आव्हान संपुष्टात आलेय. कोलकात्याने दिलेले 149 धावांचे आव्हान राजस्थानने एका विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. या विजयासह राजस्थानने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. राजस्थानचा हा सहावा विजय होय.. या विजयासह राजस्थानने आघाडीच्या चार संघामध्ये स्थान पटकावलेय. राजस्थानचे 12 गुण झाले आहेत. राजस्थानला प्लेऑफमद्ये पोहचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय अनिवार्य आहे.
12 सामन्यात कोलकात्याला फक्त पाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर सात सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे कोलकात्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याशिवाय आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोलकात्याला सलामी जोडी मिळालीच नाही. कोलका्याने सलामीसाठी अनेक प्रयोग केले, पण यश मिळाले नाहीत.
कोलकात्याच्या सामन्यात काय काय झाले ?
एक एप्रिल 2023 - पंजाबने कोलकात्याचा सात धावांनी पराभव केला.
सहा एप्रिल 2023 - कोलकात्याने आरसीबीला 81 धावांनी हरवले.
नऊ एप्रिल 2023 - कोलकात्याने अखेरच्या चेंडवर गुजरातचा पराभव केला. रिंकू सिंह याने लागोपाठ पाच षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला होता.
14 एप्रिल 2023 - हैदराबादने कोलकात्याला 23 धावांनी हरवले.
16 एप्रिल 2023 - ईडन गार्डन्स मैदानावर मुंबईने कोलकात्याचा पाच विकेटने पराभव केला.
20 एप्रिल 2023 - दिल्लीने कोलकात्याचा चार विकेटने पराभव केला.
23 एप्रिल 2023 - धोनीच्या नेतृत्वातील चेन्ईने कोलकात्याला 49 धावांनी हरवले.
26 एप्रिल 2023 - कोलकात्याने पुन्हा एकदा आरसीबीचा पराभव केला. कोलकात्याने 21 धावांनी सामना जिंकला.
29 एप्रिल 2023 - गुजरातने कोलकात्याला सात विकेटने पराभूत केले. या विजयासह गुजरातने पराभवाचा वचपा काढला.
4 मे 2023 - कोलकात्याने हैदराबादचा पाच धावांनी पराभूत करत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवले.
8 मे 20233 - कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पंजाबचा पराभव केला. रिंकू सिंह याने दमदार विजय मिळवून दिला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना रिंकून चौकार लगावला.
11 मे 2023 - राजस्थानचा कोलकात्यावर नऊ विकेटने विजय
कोलकाता या संघाचे गणित बिघडवणार ?
कोलकात्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. कोलकात्याचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. कोलकाता या दोन सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचे गणित बिघडवू शकतात. कोलकात्याचे पुढील सामने चेन्नई आणि लखनौ या दोन संघासोबत आहेत. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्तीत आहेत. लखनौचा पराभव झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
कोलकात्याचे पुढील सामने कधी ?
14 मे 2023 - रविवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यात लढत होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे.
20 मे 2023 - शनिवारी लखनौ आणि कोलकाता यांच्यात सामना रंगणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंघणार आहे.