सामन्याआधी मिठी मारली, मग षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले; भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न
CSK vs MI, Hardik Pandya: चेन्नईच्या फलंदाजीवेळी एमएस धोनीनं चार चेंडूचा सामना करताना 20 धावांची खेळी केली. यामध्ये षटकारांची हॅट्ट्रीक केली होती.
CSK vs MI, Hardik Pandya: आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी विजय मिळवला. मुंबईकडून रोहित शर्माने एकट्यानं लढा दिला. रोहित शर्मानं शानदार शतकी खेळी केली. पण रोहित शर्माच्या शतकावर एमएस धोनीनं मारलेले तीन षटकार भारी पडले.
चेन्नईच्या फलंदाजीवेळी एमएस धोनीनं चार चेंडूचा सामना करताना 20 धावांची खेळी केली. यामध्ये षटकारांची हॅट्ट्रीक केली होती. इतक्याच धावांच्या फरकानं चेन्नईने मुंबईचा पराभव केला. हार्दिक पांड्याच्या चार चेंडूवर धोनीनं 20 धावा केल्या होत्या. मुंबईकडून 20 वं षटक टाकलं. मात्र यावरुन हार्दिक पांड्याने टाकल्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.
सुनील गावसकर नेमकं काय म्हणाले?
अगदी सामान्य गोलंदाजी आणि सामान्य कर्णधार...कदाचित मी बऱ्याच काळापासून पाहिलेला सर्वात वाईट प्रकारची गोलंदाजी होती. हार्दिकने षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले. एक षटकार टाकल्यानंतर जेव्हा फलंदाज लेन्थ चेंडूच्या शोधात आहे, हे तुम्हाला माहिती होतं. तरीदेखील लेग साइडच्या दिशेने फुलटॉस चेंडू टाकला, असं म्हणत सुनील गावसकर यांनी प्रश्न उपस्थित केले. शिवम दुबे आणि रुतुराज गायकवाडने इतकी चांगली फलंदाजी केली असली तरीही त्यांना रोखता आले असते. चेन्नईला देखील 185-190 धावांपर्यंत मर्यादित ठेवता आले असते, असं सुनील गावसकरांनी सांगितले. सामन्याआधी हार्दिकने एमएस धोनीला भेटून मिठी मारली होती, याची आठवण देखील सुनील गावसकर यांनी करुन दिली.
"It's affecting him, it's affecting his cricket and something needs to happen" - #KevinPietersen on Hardik's last over vs @msdhoni and the ups and downs of his captaincy!
— Star Sports (@StarSportsIndia) April 14, 2024
📹 | Watch the legends of the game, #SunilGavaskar and @KP24 talk more about @hardikpandya7's leadership!… pic.twitter.com/QxCKE6KXf8
मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. त्यासाठी रोहित आणि ईशानने 70 धावांची भागीदारी केली. यानंतर इशान किशन 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. पाथीरानाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईची दुसरी विकेटही 70 धावांवर पडली. सूर्यकुमार आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिसरी विकेट तिलक वर्माच्या रूपाने पडली. 134 धावांवर मुंबईची चौथी विकेट पडली. कर्णधार हार्दिक पांड्या मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. दरम्यान, चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 206 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 69 धावा केल्या. शिवम दुबेने नाबाद 66 धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यानंतर शेवटचे चार चेंडू शिल्लक असताना धोनी फलंदाजी आला आणि त्याने 4 चेंडूत 20 धावा केल्या.
संबंधित बातम्या:
टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान
7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo's
उर्वशी रौतेला ऋषत पंतला नव्हे, तर फुटबॉलपटूला करतेय डेट?; फोटोवरील 'कॅप्शन'ने लक्ष वेधलं!