Abhishek Sharma : इकाना स्टेडियममध्ये अभिषेक शर्माकडून 'तोडफोड बॅटिंग', गगनचुंबी सिक्सने 'टाटा कर्व्ह'चा चेहरामोहरा बदलला, व्हिडिओ व्हायरल
Abhishek Sharma Broke TATA Curvv Glass Video : युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा त्याच्या वादळी खेळीमुळे सर्वांना नेहमीच आश्चर्यचकित करतो.

Abhishek Sharma Breaks Car Glass : आयपीएल 2025 चा 65 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झाला. युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा त्याच्या वादळी खेळीमुळे सर्वांना नेहमीच आश्चर्यचकित करतो. पण या सामन्यात त्याच्या एका गगनचुंबी सिक्सने 'टाटा कर्व्ह'चा चेहरामोहरा बदलला. अभिषेकने मारला चेंडू थेट स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या टाटा कर्व्ह कारच्या विंडशील्डवर गेला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
गगनचुंबी सिक्सने 'टाटा कर्व्ह'चा चेहरामोहरा बदलला...
सनरायझर्स हैदराबादने पहिल्या षटकात 8 धावा काढल्या, त्यानंतर भुवनेश्वर कुमार दुसरे षटक टाकण्यासाठी आला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर अभिषेकने डीप मिड-विकेटकडे एक षटकार मारला. चेंडू सीमेपलीकडे उभ्या असलेल्या टाटा कर्व्ह कारच्या पुढच्या काचेवर पडला आणि गाडीची काच फोडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#AbhishekSharma starts with fireworks! Sends it sailing for six!
— Star Sports (@StarSportsIndia) May 23, 2025
Will #RCB find a way to contain the onslaught in their #Race2Top2?
Watch the LIVE Action 👉 https://t.co/SI62QyCPRK#IPLOnJioStar 👉 #RCBvSRH | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/fQJxgRorEu
गाडी कोणाला मिळणार?
आयपीएल सामन्यांमध्ये 'टाटा कर्व्ह' कार प्रायोजक म्हणून उपस्थित असते. ही कार 'कर्व्ह सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन' पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला दिली जाते. याचा अर्थ असा की आयपीएल 2025 मध्ये किमान 100 चेंडू खेळणाऱ्यांमध्ये ज्या खेळाडूचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम असेल त्याला ही गाडी बक्षीस म्हणून दिली जाईल.
अभिषेकची तुफानी खेळी...
सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजी करायला आला. अभिषेक शर्माने ट्रॅव्हिस हेडसह स्फोटक फलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 54 धावांची भागीदारी झाली. अभिषेक शर्मा मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. अभिषेक शर्माने फक्त 17 चेंडूत 3 चौकार आणि तितकेच षटकार मारले आणि 34 धावा केल्या, या काळात त्याचा स्ट्राईक रेट 200 होता.
अभिषेकनंतर इशान किशनचे वादळ...
अभिषेक शर्मानंतर इशानने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हेड आऊट झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशनने आरसीबीच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. तो हंगामातील त्याचे दुसरे शतक पूर्ण करण्यापासून 6 धावांनी हूकला. त्याने 195 च्या स्ट्राईक रेटने 94 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामध्ये 5 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. इशान किशनने 48 चेंडूंचा सामना केला. त्याच्या खेळीमुळे हैदराबादने आरसीबीसमोर विजयासाठी 232 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले.





















