(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
हैदराबादसाठी अभिषेक शर्माने वादळी अर्धशतक ठोकले. अभिषेक शर्माने 6 षटकार ठोकत 66 धावांचा पाऊस पाडला. वादळी खेळीनंतर अभिषेक शर्माने इतिहास रचलाय. 17 वर्षांच्या आयपीएल इतिहासात कुणालाही न जमलेला रेकॉर्ड शर्माने आपल्या नावावर केला आहे.
Abhishek Sharma SRH vs PBKS : अभिषेक शर्माच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा चार विकेट्सने पराभव केला. पंजाबने दिलेल्या 215 धावांचं आव्हान हैदराबादने 19.1 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. हैदराबादसाठी अभिषेक शर्माने वादळी अर्धशतक ठोकले. अभिषेक शर्माने 6 षटकार ठोकत 66 धावांचा पाऊस पाडला. वादळी खेळीनंतर अभिषेक शर्माने इतिहास रचलाय. 17 वर्षांच्या आयपीएल इतिहासात कुणालाही न जमलेला रेकॉर्ड शर्माने आपल्या नावावर केला आहे.
कुणालाच न जमलेला रेकॉर्ड अभिषेकच्या नावावर -
यंदाच्या आयपीएलमध्ये अभिषेक शर्माने 14 सामन्यात 41 षटकारांचा पाऊस पाडला आहे. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. पण त्यासोबतच त्याने मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आता अभिषेकच्या नावावर जमा झालाय. याआधी आयपीएलमध्ये कुणालाही एकाच हंगामात 41 षटकार ठोकता आले नव्हते.
2008 पासून आयपीएलचा रनसंग्राम सुरु झाला. तेव्हापासून आतापर्यंत कुणालाही न जमलेला रेकॉर्ड अभिषेक शर्माने केला आहे. अभिषेक शर्माने य़ंदाच्या हंगामात 41 षटकार ठोकले आहेत. आतापर्यंत 17 वर्षांमध्ये एकाही फलंदाजाला एका हंगामात 41 षटकार मारता आले नव्हते. पण अभिषेकने हा विक्रम मोडला आहे.
ABHISHEK SHARMA has hit most sixes by an Indian in a single season in IPL history. 🫡 pic.twitter.com/MA7pF7cXOL
— Johns. (@CricCrazyJohns) May 19, 2024
सर्वाधिक षटकार अभिषेकच्या नावावर -
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे. त्याने 14 सामन्यात 41 षटकार ठोकले आहेत. त्याने विराट कोहली, हेनरिक क्लासेन यांना मागे टाकलेय. विराट कोहलीच्या नावावर 37 षटकारांची नोंद आहे. निकोलस पूरन याने 36 षटकार ठोकले आहेत. हेनरिक क्लासेनच्या नावावर 33 षटकार आहेत.
Abhishek Sharma has hit most sixes in IPL 2024.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2024
- The 23 year old is showcasing his class and power game. 💥 pic.twitter.com/1NaQxe7I0F
हैदराबादसाठी सर्वाधिक षटकार -
17 वर्षांच्या इतिहासात हैदराबादसाठी एकाच हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आता अभिषेक शर्माच्या नावावर झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर हेनरिक क्लासेन आहे, त्याने 33 षटकार ठोकले आहेत. डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 2024 मध्ये ट्रेविस हेड याने 31 षटकार ठोकलेत. तर 2016 मध्ये डेविड वॉर्नर याने 31 षटकार ठोकले होते.
आणखी वाचा :
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?