विराट कोहलीचा बॅडपॅच सुरुच... 11 सामन्यात 3 वेळा शून्यावर बाद, दोन वेळा 40 + धावसंख्या
IPL 2022 Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी मागील दोन वर्ष खराब राहिली आहेत. विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. विराट कोहलीवर फॉर्म रुसला आहे
![विराट कोहलीचा बॅडपॅच सुरुच... 11 सामन्यात 3 वेळा शून्यावर बाद, दोन वेळा 40 + धावसंख्या 3 times out zero in 11 matches 2 times made 40 ipl 2022 is passing like nightmare for virat kohli IPL 2022 Marathi news विराट कोहलीचा बॅडपॅच सुरुच... 11 सामन्यात 3 वेळा शून्यावर बाद, दोन वेळा 40 + धावसंख्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/70e2378f395d715fe1bae720a63c34c0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022 Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी मागील दोन वर्ष खराब राहिली आहेत. विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. विराट कोहलीवर फॉर्म रुसला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यात विराट कोहली तीन वेळा शून्यावर बाद झाला. त्याशिवाय फक्त दोन वेळा विराटला 40 पेक्षा जास्त धावा काढता आल्या. त्यावेळीही स्ट्राईकरेट चिंतेचा विषय होता.
हैदराबादविरोधात विराट कसा झाला बाद? -
आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. तर हैदराबादकडून जगदीशा सुचित पहिले षटक टाकले. सुचितच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली विल्यमसनकडे झेल देऊन बाद झाला. याआधी हैदराबादविरोधात मार्को जानसेनने विराट कोहलीला गोल्डन डकवर आऊट केले होते. तर दुष्मांता चमीराने विराटला गोल्डन डक केले होते.
IPL 2022 विराट कोहलीचे प्रदर्शन कसे राहिलेय?
आयपीएलच्या 15 व्या हंगामात विराट कोहलीचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिलेय. विराट कोहली यंदा तीन वेळा शून्यावर बाद झालाय. तर एक वेळा 1 धाव काढून परतलाय. कोलकाताविरोधात 12, राजस्थानविरोधात 5, दिल्लीविरोधात 12, राजस्थानविरोधात 9 धावा काढून बाद झालाय. विराट कोहलीने 11 सामन्यात 21 च्या सरासरीने आणि 111 च्या स्ट्राईक रेटने 216 धावा चोपल्या आहेत.
आयपीएलमध्ये विराट कोहलीनं सहाव्यांदा शून्यावर बाद-
विरुद्ध संघ | गोलंदाजाचं नाव | वर्ष |
मुंबई इंडियन्स | आशीष नेहरा | 2008 |
पंजाब किंग्ज | संदीप शर्मा | 2014 |
कोलकाता नाईट रायडर्स | नाथन कुल्टर नाईल | 2017 |
लखनौ सुपर जायंट्स | दुष्मंता चमीरा | 2022 |
सनरायजर्स हैदराबाद | मार्को जेनसन | 2022 |
सनरायजर्स हैदराबाद | जे सुचित | 2022 |
आयपीएल 2022 मधील विराट कोहलीचं प्रदर्शन-
1) 41*(29)
2) 12(7)
3) 5(6)
4) 48(36)
5) 1(3)
6) 12(14)
7) 0(1)
8) 0(1)
9) 9(10)
10) 58(53)
11) 30(33)
12) 0(1)
हे देखील वाचा-
- CSK vs DC: रवींद्र जाडेजा संघाबाहेर, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
- Team India Captaincy: 'माझ्याऐवजी धोनीला कर्णधार का बनवलं?' 'त्या' वादावर युवराज सिंह स्पष्टच बोलला
- IPL 2022 : आयपीएलसोडून राजस्थानचा मॅचविनर खेळाडू मायदेशी परतला, पाहा व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)