Ayush Mhatre IPL debut : काल वैभव, आज आयुष म्हात्रे! धोनीची मोठी खेळी, वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईच्या मराठमोळ्या खेळाडूचे चेन्नईत पदार्पण
Ayush Mhatre IPL debut : मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी भिडत आहे

Ayush Mhatre IPL debut News : मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी भिडत आहे. अशा परिस्थितीत, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने प्लेइंग-11 निवडताना मोठी खेळी खेळली आहे. त्याने 17 वर्षांच्या मुंबईच्या मराठमोळ्या खेळाडूला चेन्नईत पदार्पणाची संधी दिली आहे. तो खेळाडू आहे आयुष म्हात्रे.
🚨 Toss 🚨@mipaltan won the toss and elected to bowl against @ChennaiIPL in Mumbai.
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
Updates ▶ https://t.co/v2k7Y5sIdi#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/o62WJevedv
ज्याला अलिकडेच ऋतुराज गायकवाडच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीसोबत अंडर-19 क्रिकेटमध्ये खेळला आहे, ज्याने नुकतेच वयाच्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले.
Young MumBoy for the MI clash! 🦁
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 20, 2025
Roar on, Ayush!🥳#MIvCSK #WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/mb90g3dkqJ
कोण आहे आयुष म्हात्रे?
आयुष म्हात्रे हा मुंबईचा रहिवासी आहे. त्याने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आयुष म्हात्रेने गेल्या वर्षी इराणी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या रणजी संघासाठी सलामीवीर म्हणून पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याच वेळी, त्याने 7 लिस्ट ए सामन्यांमध्ये 65 च्या सरासरीने 458 धावा केल्या आहेत. गेल्या काही काळात, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तो आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवण्यास सज्ज आहे.
The Young One marches into battle today!🦁
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 20, 2025
AYUSH MAN BHAVA! 🙌#MIvCSK #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/N9zo3AsdLe
म्हात्रे उजव्या हाताने फलंदाजी करतात आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतात. तो चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडूही ठरला आहे. त्याने 17 वर्षे आणि 278 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.
दोन्ही संघांची प्लेइंग-11
चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग-11 : शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.
मुंबई इंडियन्स संघांची प्लेइंग 11 : रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अश्विनी कुमार.
हे ही वाचा -





















