IPL 2023 : लागोपाठ दोन षटकार लगावत धोनीने मोडला स्वत:चाच विक्रम
MS Dhoni IPL 2023 : पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. तर सोमवारी लखनौचा पराभव करत चेन्नईने यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला.
MS Dhoni IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगमाला दिमाखात सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. तर सोमवारी लखनौचा पराभव करत चेन्नईने यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला. या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते एमएस धोनी याने.. आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फक्त आयपीएलमध्ये खेळतो. यंदा धोनी चेन्नईचा कर्णधारही आहे. तो मैदानात आला की चाहते जल्लोष करतात.. असाच अनुभव आयपीएलच्या यंदाच्या हंगमात आला. धोनीने लखनौविरोधात आपलाच विक्रम मोडीत काढला. गुजरातविरोधात धोनी फलंदाजी करत असताना जिओ सिनेमा जितक्या लोकांनी पाहिला.. त्यापेक्षा जास्त लोकांनी लखनौविरोधात दोन षटकार मारताना धोनीला पाहिलेय. धोनीने आपलाच विक्रम मोडीत काढलाय.
धोनीने लखनौविरोधात फक्त तीन चेंडूचा सामना केला, यामध्ये दोन षटकार लगावले. लखनौविरोधात धोनीला षटकार माराताना रेकॉर्डब्रेक 1.7 कोटी लोकांनी जियो सिनेमा अॅप पाहिले. तर याआधी गुजरातविरोधातील सामन्यावेळी धोनी फलंदाजी करताना 1.6 कोटी लोकांनी जिओ सिनेमा अॅपला भेट दिली होती. अशा पद्धतीने धोनीने आपलाच विक्रम मोडीत काढला.
धोनीला आजही फलंदाजी करताना पाहिल्यानंतर "शेर बूढ़ा हुआ है, पर शिकार करना नहीं भूला" असेच डोक्यात येते. धोनीने लखनौविरोधात दोन चेंडूवर दोन षटकार मारले. मार्क वूडच्या वेगापुढे धोनीने दोन गगनचुंबी षटकार लगावले. 41 वर्षीय धोनीने चार वर्षापूर्वी 2019 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. प्रत्येकवर्षी धोनी अपग्रेड होत असल्याचे दिसत आहे. कॅप्टन कूल धोनी चौकार आणि षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अखेरच्या षटकात धोनी धावांचा पाऊस पाडतो. 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. या हंगामात धोनीने दहा चेंडूचा सामना केलाय. यामध्ये त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला होता. धोनीने यंदाच्या हंगमात 10 चेंडूत 26 धावा वसूल केल्या.
IPL 2023 peak viewership on JioCinema:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 3, 2023
1.7cr - MS Dhoni's batting.
1.6cr - MS Dhoni's batting.
- No one can replace this man!
Highest viewership in IPL 2023 on JioCinema:
— Johns. (@CricCrazyJohns) April 3, 2023
1.7 crore when Dhoni was batting vs LSG.
1.6 crore when Dhoni was batting vs GT.
He is the brand of world cricket. pic.twitter.com/qBs4RPo5jr
IPL 2023 viewership peaked at 17M during MS Dhoni's batting.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 3, 2023
He's still the boss of this league! pic.twitter.com/RI7BwM0kxu
चार वर्षानंतर एमएस धोनी चेपॉक स्टेडिअमवर उतरला. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी धोनी धोनीच्या घोषणा सुरु केल्या. धोनीला पाहताच स्टेडिअममधील चाहत्यांमध्ये उत्साह आला होता.
धोनीचा पाच हजार धावांचा पल्ला -
लखनौविरोधात दोन गगनचुंबी षटकार मारताच धोनीने आयपीएलमधील पाच हजार धावांचा पल्ला पार केला. धोनीने 208 डावात 5004 धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीने 84 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली. एमएस धोनीने आयपीएलमध्ये 24 अर्धशतके झळकावली आहेत. 208 डावात धोनीने 232 षटकार लगावले आहेत. तर 347 चौकरांचा पाऊस पाडला आहे. धोनीला सर्वोत्तम फिनिशर म्हणूनही ओळखले जाते. धोनी आयपीएलमध्ये पाच हजार धावा पूर्ण करणारा सातवा खेळाडू ठरलाय. धोनीच्या आधी एबी डिव्हिलिअर्स, सुरेश रैना, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी पाच हजार धावांचा पल्ला पार केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीने सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलच्या नावावर आहेत. गेल याने आयपीएलमध्ये 357 षठकार आणि 405 चौकार लगावले आहेत.