(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs RCB, Match Highlights : कोलकाताची बंगळुरूवर 4 विकेटने मात, बंगळुरूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
कोलकाताचा सुनील नरेन या सामन्याचा शिल्पकार ठरला. सुनीलने सर्वाधिक चार विकेट घेत 26 धावा केल्यामुळे कोलकाताला विजय मिळवता आला.
Bangalore vs Kolkata: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन टिममध्ये रंगलेल्या सामन्यात कोलकाताने बंगळूरूवर चार विकेटने मात करत क्वालीफायर 2 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. कोलकाता सुनील नरेन या सामन्याचा शिल्पकार ठरला. सुनीलने सर्वाधिक चार विकेट घेत 26 धावा केल्यामुळे कोलकाताला विजय मिळवता आला. नरिनला सामनावीर पुरस्कार मिळाला.
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु खास कामगिरी करता आली नाही. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी बंगळुरुसाठी 49 धावा केल्या. विराटने (39) धावा केल्या. एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने बंगळूरुचा संघ 138 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
139 धावांचे गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यरने पहिल्या विकेटसाठी 41 धावा केल्या. गिलने 18 बॉलमध्ये चार चौकारासह 29 धावा केल्या. हर्षलने गिलला आऊट करत पहिले विकेट घेतले. त्यानंतर हर्षलने व्यंकटेशचे विकेट घेत कोलकाताला तिसरा झटका दिला. व्यंकटेशने 30 बॉलमध्ये एका षटकारासह 26 धावा केल्या. त्यानंतर चहलने नितीश राणाचे विकेट घेतले. राणाने 25 बॉलमध्ये एका चौकार आणि एक षटकारासह 23 धावा केल्या. नरेनने अुप्रतिम गोलंदाजी करत कोलकाताला विजयाजवळ नेले.
हर्षलने यावर्षी केले आहेत हे रेकॉर्ड
हर्षलसाठी हा सिझन अत्यंत चांगला ठरला. आयपीएलच्या या सिझनमधला सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर हर्षद ठरला. या आधी हा रेकॉर्ड मुंबई इंडियन्सचा स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. बुमराहने यूएईमध्ये झालेल्या आयपीएल मॅचच्या सिझनमध्ये 27 विकेट घेऊन हा रेकॉर्ड केला होता. तसेच एका अनकॅप्ड प्लेयरद्वारे एका सिझनमध्ये सर्वाधिक विकेटचा रेकॉर्ड देखील हर्षल पटेलने केला आहे. तसेच त्याने या टूर्नामेंमध्ये एक हॅट्रिक आणि एका वेळी पाच विकेट घेतल्या आहेत.