DC vs CSK : रोमांचक सामन्यात दिल्लीचा चेन्नईवर विजय, दिल्ली पॉईंट टेबलमध्ये टॉपवर
Delhi vs Chennai: चेन्नईने दिल्लीला 137 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 19.4 षटकात 7 विकेट गमावत पूर्ण केले.
Delhi vs Chennai: आयपीएलमध्ये आज (4 ऑक्टोबर) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. नाणफेक जिंकलेल्या दिल्लीने गोलंदाजांची निर्णय घेतला आहे. चेन्नईने दिल्लीला 137 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 19.4 षटकात 7 विकेट गमावत पूर्ण केले. या विजयामुळे दिल्ली पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहचली आहे.
दिल्लीकडून शिमरोन हेटमायरने नाबाद 18 बॉलमध्ये 28 धावा केल्या. हेटमायरशिवाय अलावा शॉ ने 18, धवन ने सर्वाधिक 39 धावा केल्या.दिल्लीकडूनअक्षर पटेल ने 2, जबकि एनरिक नॉर्खिया, आवेश खान आणि रविचंद्रन अश्विनने एक-एक विकेट घेतेले
चेन्नईने 20 षटकात 5 बाद 136 धावा केल्या. चेन्नईचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. रायुडूने नाबाद अर्धशतक ठोकले. अंबाती रायुडूने 43 बॉलमध्ये 55 धावा केल्या आहेत.
दिल्लीने आत्तापर्यंत 13 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रत्येकी 10 सामने जिंकले आहेत. दिल्लीचे 20 पॉइंट आहेत. याचबरोबर दिल्लीचा संघ पॉइंट टेबलवर पहिल्या नंबरवर आहे.
Playing 11
चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन: फाफ डु प्लेसी, रुतुराज गायकवाड़, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर आणि जोश हेजलवुड
दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कॅप्टन), शिमरन हेटमयार, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, कगीसो रबाडा आणि अवेश खान