एक्स्प्लोर

लिलावात पाकिस्तानच्या खेळाडूला खरेदी केलं, काव्या मारन अडचणीत; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आयपीएलसाठी...

आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन (Kavya Maran) या सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

BCCI Rajiv Shukla On Kavya Maran Abrar Ahmed The Hundred League : आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन (Kavya Maran) या सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. इंग्लंडमधील द हंड्रेड (The Hundred 2026) लीगसाठी सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला कोट्यवधी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर काव्या मारनवर जोरदार टीका होत असून त्यांना ट्रोलही केले जात आहे. या वादानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी स्पष्टपणे सांगितले की हे प्रकरण बोर्डाच्या अधिकारक्षेत्रात नाही. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना संधी देऊ नये, अशी मागणी काही चाहत्यांकडून होत आहे. मात्र काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्सने हा नियम पाळला नाही, असा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.

राजीव शुक्ला यांचे मोठे वक्तव्य (BCCI Rajiv Shukla On Kavya Maran Abrar Ahmed)

या संपूर्ण वादावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “हा विषय आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. ही खरेदी आयपीएलसाठी नाही, तर परदेशी लीगसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत निर्णय त्या फ्रँचायझीनेच घ्यायचा आहे. बीसीसीआय यामध्ये काही करू शकत नाही.”

काव्या मारनला आयपीएलमधून बाहेर काढण्याची मागणी 

काव्या मारन या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती असून त्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मालकीण आहेत. आयपीएलदरम्यान त्या नेहमी संघासोबत स्टेडियममध्ये उपस्थित असतात. मात्र पाकिस्तानी खेळाडूची खरेदी केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. काही चाहत्यांनी तर त्यांना आयपीएलमधून बाहेर काढण्याची मागणीही केली आहे.

अबरार अहमदवर काव्या मारनने किती कोटींची बोली लावली? (Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge)

अबरार अहमदला सनरायजर्स लीड्सनं 190000 पौंड म्हणजेच जवळपास 2.34 कोटी रुपयांना खरेदी केलं. पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याच्यावर सुरुवातीला ट्रेंट रॉकेटसनं बोली लावली होती. त्यांनी अबरार अहमदसाठी  एक लाख पौंड इतकी बोली लावली होती. यानंतर सनरायजर्स लीडसनं 190000 पौंड बोली लावत अबरार अहमदला संघात घेतलं.  विशेष म्हणजे भारतीय मालकीच्या फ्रँचायझीकडून खरेदी होणारा तो या स्पर्धेतील पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.

‘द हंड्रेड’ लीगमध्ये भारतीय फ्रँचायझींचीही उपस्थिती

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्या आयोजनाखाली ‘द हंड्रेड’ लीग खेळवली जाते. या स्पर्धेत 100 चेंडूचा सामना खेळला जातो. या लीगमध्ये भारतीय मालकीच्या चार संघांचा सहभाग आहे. त्यामध्ये मॅन्चेस्टर सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स लंडन, साउदर्न ब्रेव्ह आणि सनरायझर्स लीड्स या संघांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्स लंडन हा संघ मुंबई इंडियन्स ग्रुपचा आहे, तर मॅन्चेस्टर सुपर जायंट्स संघ लखनऊ सुपर जायंट्स ग्रुपच्या मालकीचा आहे. साउदर्न ब्रेव्ह संघ दिल्ली कॅपिटल्सच्या सहमालकांकडे आहे. तर सनरायझर्स लीड्सचा मालकीहक्क सनरायझर्स हैदराबाद समूहाकडे आहे. 

अबरार अहमदची कारकीर्द- (Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge)

27 वर्षीय अब्रार अहमदने पाकिस्तानसाठी 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 52 विकेट्स आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, त्याने 6.67 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. त्याच्या एकूण टी-20 क्रिकेट कारकिर्दीचा विचार करता, त्याने 84 सामन्यांमध्ये 109 विकेट्स पटकावल्या आहेत. 

हे ही वाचा -

Match Fixing News : टी-20 वर्ल्ड कप संपताच क्रिकेटमध्ये भूकंप! मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी खळबळ; 3 खेळाडूंवर ICCची थेट मोठी कारवाई

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Birthday : फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
MI IPL 2027 Released Players : अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानचा मैदानावरच धिंगाणा, सगळेच खुळ्यासारखे पळत सुटले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानचा मैदानावरच धिंगाणा, सगळेच खुळ्यासारखे पळत सुटले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
दिवाळी भारतात, पण फटाके फोडले पाकिस्तानने! आशिया कपमध्ये मोठा उलटफेर; 61 धावांत अर्धा संघ गारद, तरी पाकने मारली बाजी, टीम इंडियाचा पराभव
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : दिवाळी भारतात, पण फटाके फोडले पाकिस्तानने! आशिया कपमध्ये मोठा उलटफेर; 61 धावांत अर्धा संघ गारद, तरी पाकने मारली बाजी, टीम इंडियाचा पराभव

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget