एक्स्प्लोर

CSK vs RCB, Innings Highlights : रविंद्र जाडेजाची ऑलराऊंडर खेळी, चेन्नईचा बंगळुरुवर मोठा विजय, चेन्नई गुणतालिकेत टॉपवर

CSK vs RCB, Innings Highlights : धडाकेबाज फलंदाजीनंतर गोलंदाजीतही सर रविंद्र जाडेजानं केलेल्या धमाकेदार खेळीच्या बळावर चेन्नईने बंगळुरुवर 69 धावांनी मोठा विजय मिळवला. फलंदाजी करताना 28 चेंडूत पाच षटकारांसह 62 धावा ठोकणाऱ्या रविंद्र जाडेजानं गोलंदाजी करताना 4 षटकात 13 धावा देत 3 विकेटही घेतल्या.

CSK vs RCB, Innings Highlights : धडाकेबाज फलंदाजीनंतर गोलंदाजीतही सर रविंद्र जाडेजानं केलेल्या धमाकेदार खेळीच्या बळावर चेन्नईने बंगळुरुवर 69 धावांनी मोठा विजय मिळवला. फलंदाजी करताना 28 चेंडूत पाच षटकारांसह 62 धावा ठोकणाऱ्या रविंद्र जाडेजानं गोलंदाजी करताना 4 षटकात 13 धावा देत 3 विकेटही घेतल्या. तसेच एक गडी धावबादही केला. 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुला 20 षटकात 9 बाद 122 धावा करता आल्या. विजयासाठी दिलेल्या 192 धावांचं लक्ष्य गाठताना बंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही. पडिक्कलनं फटकेबाजी करत आशेचा किरण दाखवला. मात्र विराट कोहली 8 धावा करत बाद झाला.

यानंतरही वॉशिंग्टन सुंदरही चांगली कामगिरी करु शकला नाही. अवघ्या 7 धावा करून तो बाद झाला. तिसऱ्या षटकात एबी डिव्हिलियर्स 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर पडिक्कल देखील बाद झाला. त्याने 15 चेंडूत 34 धावांची खेळी केली. बंगळुरुच्या अपेक्षा असलेला मॅक्सवेलही स्वस्तात बाद झाला. त्याने 22 धावा केल्या.  जेमिसननं 16 धावांचं योगदान दिलं. चेन्नईकडून जाडेजानं 3 ताहिरनं 2 तर सॅम करन, शार्दुल ठाकूरनं एक एक विकेट घेतली. 

Ravindra Jadeja : सर रविंद्र जाडेजा.. 5 षटकार, एक चौकार... हर्षल पटेलच्या एका षटकात 37 धावा

 त्याआधी चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 192 धावांचं लक्ष्य दिलं होतं. चेन्नईकडून रविंद्र जाडेजानं मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज धावांचा अक्षरशा पाऊस पाडला. रविंद्र जाडेजाच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर चेन्नईनं बंगळुरुसमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं. रविंद्र जाडेजानं हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात पाच षटकारांसह 36 धावा वसूल करत संघाला मजबूत धावसंख्या उभारुन दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ जोडीनं चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीनं 74 धावांची भागिदारी केली.  यजुवेंद्र चहलनं ऋतुराजला बाद करत पहिला धक्का दिला. ऋतुराजनं 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनानं फाफला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र 18 चेंडूत 24 धावा करून सुरेश रैना बाद झाला. त्याने खेळीत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले.  त्यानंतरच्या दुसऱ्याच चेंडुवर हर्षल पटेलनं फाफ डूला बाद केलं. त्यानं 41 चेंडूत 50 धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या रविंद्र जाडेजानं तुफान फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात त्याने हर्षल पटेलची चांगलीच धुलाई करत 5 षटकार आणि 1 चौकार ठोकत 37 धावा वसूल केल्या. हर्षल पटेलनं या शेवटच्या षटकाआधी तीन विकेट घेत चांगली गोलंदाजी केली होती. मात्र या शेवटच्या षटकात त्याच्या कामगिरीवर रविंद्र जाडेजानं पाणी फेरलं.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
×
Embed widget