(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 SRH vs RCB: बंगलोरकडून पदार्पणात अर्धशतक ठोकणारा देवदत्त पड्डिकल कोण आहे?
वदत्त पड्डिकलने गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करत चमकदार कामगिरी केली होती.
IPL 2020 SRH vs RCB: आयपीएल 2020 च्या तिसर्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मजबूत फलंदाजांनी सुसज्ज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायजर्स हैदराबादसमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आजच्या सामन्यात बंगलोरकडून देवदत्त पड्डिकल, अॅरोन फिंच आणि जोश फिलिप यांनी पदार्पण केले. पदापर्णातच देवदत्तने अर्धशतक ठोकत सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं. देवदत्तने 42 चेंडूत 56 धावांची खेळी केली.
जोश फिलिपने ऑस्ट्रेलियन टी -20 लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना शानदार प्रदर्शन केलं होतं. त्यावेळी तो चर्चेत आला होता. तर देवदत्त पड्डिकलने गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करत चमकदार कामगिरी केली होती.
देवदत्त पड्डिकल कोण आहे?
20 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पड्डिकल कर्नाटककडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतो. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफीतून टी -20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. देवदत्तच्या नावे 12 टी-20 सामन्यांमध्ये 175.75 च्या स्ट्राइक रेटने 580 धावा आहेत.
2019-20 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्त पड्डिकलने केवळ 11 डावांमध्ये 67.66 च्या सरासरीने 609 धावा केल्या. ज्यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफीत पड्डिकलने 580 धावा केल्या. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या