एक्स्प्लोर

अॅश्टन टर्नरचं 'डक टेल्स', सलग पाच वेळा भोपळाही न फोडता बाद

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅश्टन टर्नर हा टी20 क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा 'डक' स्कोअर करणारा पहिलाच फलंदाज ठरला, तर आयपीएलमध्ये सलग तीन 'डक' मिळवणारा तो सहावा क्रिकेटपटू ठरला आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅश्टन टर्नरच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा 'डक' स्कोअर करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. टर्नर सलग पाच सामन्यांमध्ये भोपळाही न फोडता बाद झाला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या टर्नरने दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळताना हा लाजिरवाणा विक्रम रचला. 9 फेब्रुवारीला 26 वर्षीय टर्नरच्या दुर्दैवाचा फेरा सुरु झाला. बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्सकडून अॅडलेड स्ट्राईकर्सविरुद्ध खेळताना त्याने पहिला भोपळा मिळवला होता. विझागमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टर्नरने दुसरा भोपळा रचला. पाच चेंडूंना सामोरा जाऊनही अॅश्टनला एकही धाव खेळता आली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये टर्नरने तीन वेळा डक स्कोअर केले. आधी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि त्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तो एकही धाव न रचता तंबूत परतला. अशाप्रकारे टर्नरच्या खात्यात सलग पाच शून्य जमा झाली आहेत. त्यामुळे आता तो 'अर्धा डझन अंडी' मिळवण्याच्या मार्गावर आहे. आयपीएलमध्ये सलग तीन 'डक' मिळवणारा तो सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. अशोक दिंडा, राहुल शर्मा, गौतम गंभीर, पवन नेगी आणि शार्दुल ठाकूर यांच्या पंक्तीत तो विराजमान झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
Nitish Rana Emotional DPL VIDEO : 27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget