एक्स्प्लोर

Asia Cup 2023: क्रिकेटमध्ये फ्लॉप पण हॉकीत हिट, पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाचे मोदींकडून अभिनंदन 

Asia Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानात पावसामुळे रंगाचा बेरंग झाला. पण हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला आस्मान दाखवत बाजी मारली.

Indian Hockey Team Won At 5s Asia Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानात पावसामुळे रंगाचा बेरंग झाला. पण हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला आस्मान दाखवत बाजी मारली. शनिवारी भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप 5s चषकाव नाव कोरले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगतदार झाला. सामना ४-४ असा बरोबरीत सुटला होता. अखेर पेनेल्टी शूटआऊटने सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने २-० ने बाजी मारत चषकावर नाव कोरले.  भारताच्या रोमहर्षक विजयानंतर खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. फायनलमधील भारताच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केले.

पुरुषांच्या हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर (एक्स) हॉकी टीम इंडिाचा फोटो पोस्ट करत कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,  

“हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेते! ! 
भारतीय पुरुष हॉकी संघांचे एका अविस्मरणीय विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. हा विजय म्हणजे आपल्या खेळाडूंचा दृढनिश्चय आणि समर्पित वृत्तीचा दाखला आहे. या विजयामुळे पुढल्या वर्षी ओमानमध्ये होणाऱ्या हॉकी5 विश्वचषकासाठी देखील आपण पात्र ठरलो आहोत. आपल्या खेळाडूंचे धैर्य आणि निर्धार आपल्या देशाला प्रेरित करत राहील.”

पाहा पंतप्रधान मोदींचे ट्वीट

शूटआऊटमध्ये भारताकडून मनिंदर सिंह आणि गुरज्योत सिंह यांनी गोल केले.  भारताचा यष्टिरक्षक सूरज करकेराने पाकिस्तानच्या अर्शद लियाकत आणि मोहम्मद मुर्तझा यांना शूटआऊटमध्ये गोल करण्यापासून रोखले. भारताकडून मोहम्मद राहिलने सामन्यात दोन गोल केले. याशिवाय जुगराज सिंह आणि मनिंदर सिंह यांनी 1-1 गोल केला. राहिलने 19व्या आणि 26व्या मिनिटाला संघासाठी गोल केला. 7व्या मिनिटाला जुगराज सिंगने तर 10व्या मिनिटाला मनिंदर सिंह याने गोल केला.  तर पाकिस्तानसाठी अब्दुल रहमान, झिकारिया हयात, अर्शद लियाकत आणि कर्णधार अब्दुल राणा यांनी १-१ गोल ​​केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Marathi Serial Updates Shivani Surve : 12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Nirupam PC : रविंद्र वायकरांवर EVM घोटाळ्याचे आरोप संजय निरुपम यांची पत्रकार परिषदNagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यूShivaji Maharaj Wagh Nakh News : जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्नSanjay Raut On Silver Oak : शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत सिल्व्हर ओकवर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Marathi Serial Updates Shivani Surve : 12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
Sandhan Valley Closed : सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
Maharashtra Police Recruitment 2024 : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
पोलीस भरतीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
West Bengal train accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, पं. बंगालमध्ये भीषण दुर्घटना
मोठी बातमी : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, पं. बंगालमध्ये भीषण दुर्घटना
Chandu Champion Kartik Aaryan : 'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज; अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली, आता बॉलिवूडपटात पार्श्वगायन
'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज; अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली, आता बॉलिवूडपटात पार्श्वगायन
Embed widget