Ind vs Eng | पहिल्याच टी20 सामन्यात विराटच्या नावे लाजिरवाणा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाला टी20 मालिकेमध्ये सुरुवातीच्याच सामन्यामध्ये अपयशाचा सामना करावा लागला. संघातील सलामीच्या जोडीसमवेत अपेक्षा असणाऱ्या फलंदाजांनीही या सामन्यात भ्रमनिरास केला.
Ind vs Eng भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. पण, टी20 मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यातच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. जणू, इंग्लंडनं मिळालेल्या पराभवाचा वचपाच काढला.
भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनीही या सामन्यात क्रीडारसिकांना नाराज केलं. सलामीची जोडी स्वस्तात माघारी गेली, तर तिथं कर्णधार विराट कोहली यालाही सामन्यात खातं न खोलताच तंबूत माघारी परतावं लागलं. ज्यामुळं त्याच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
Ind vs Eng टी20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात विराटला फिरकी गोलंदाज आदिल रशिद यानं बाद केलं. यावेळी 14 व्या वेळेस विराट एक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डकमध्ये बाद झाला. यानंतर विराट हा भारतीय कर्णधार बनला आहे जो बहुतेक वेळा स्वरूपात शून्यावर बाद झाला.
लेकीनं शेअर केला नीना गुप्ता, विवियन रिचर्ड्स यांचा Unseen Photo
नवल नसणाऱ्या या विक्रमामध्ये विराटपूर्वी सौरव गांगुलीच्या नावाचा समावेश होता, जो कर्णधार म्हणून 13 वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यामागोमाग धोनी (11 वेळा), कपिल देव (10 वेळा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (8 वेळा) यांच्याही नावाचा समावेश आहे.
आंततरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 28 व्या वेळेस विराट खातं न उघडताच तंबूत परतला. या यादीत मात्र विराटला सचिन तेंडुलकरनं मागे टाकलं आहे. सचिन त्याच्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये तब्बल 34 वेळा शून्यावरच बाद झाला आहे. यामागोमाग वीरेंद्र सेहवाग (31 वेळा) आणि सौरव गांगुली (29 वेळा) यांच्याही नावाचा समावेश आहे.