World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेत भारताचा दबदबा; पुरुषांनी कझाकस्तान आणि महिलांनी इजिप्तला नमवलं
World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघानी (Indian women’s team) इजिप्तचा (Egypt) पराभव करत बाद फेरीत प्रवेश केलाय.
World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघानी (Indian women’s team) इजिप्तचा (Egypt) पराभव करत बाद फेरीत प्रवेश केलाय. तर, भारतीय पुरूष संघानं (India Men’s Team) गट 2 मध्ये कझाकस्तानचा (Kazakhstan) 3-2 असा पराभव केलाय. पुरूषांना बाद फेरी गाठण्यासाठी मंगळवारी फ्रान्सला पराभूत करावं लागेल.
वर्ल्ड टीम टेबल टेनिसच्या गट 5 मध्ये भारतीय महिलांच्या सांघिक संघानं 3-1 असा विजय मिळवलाय. ज्यात श्रीजा अकुलानं इजिप्तच्या हाना गोदाचा 11-6, 11-4, 11-1 असा पराभव केलाय. तर, मनिका बत्रानं इजिप्तच्या डीना मेश्रेफविरुद्ध 8-11, 11-6, 11–7, 2-11, 11-8 असा विजय मिळवलाय. दरम्यान, दिया चितळेच्या पदरात निराशा पडली. तिला युसरा हेल्मीकडून 11-5, 10-12, 11-9, 9-11, 4-11 असा पराभव स्वीकारावा लागलाय. याशिवाय, श्रीजा अकुलानं डीना मेश्रेफला 11-8, 11-8, 9-11, 11-6 असं नमवलं.
ट्वीट-
World Team Table Tennis Championship
— Sports India (@SportsIndia3) October 3, 2022
𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐰𝐨𝐦𝐞𝐧 𝐭𝐞𝐚𝐦 𝐚𝐝𝐯𝐚𝐧𝐜𝐞 𝐭𝐨 𝐏𝐫𝐞-𝐪𝐮𝐚𝐫𝐭𝐞𝐫𝐟𝐢𝐧𝐚𝐥𝐬 as they beat Egypt by 3-1 in last group stage game and finish 2nd
Sreeja Akula won both games while Manika won 3rd game for India . Diya lost her match pic.twitter.com/7TopMH8je2
पुरूषांच्या गट 2 सामन्यात भारताच्या सांघिक संघानं कझाकस्तानचा 3-2 असा पराभव केला. ज्यात जी साथियाननं डेनिस झोलूदेवचा 11-1, 11-9, 11-5 असा पराभव केलाय. तर, हरमीत देसाईला किरील गेरान्सीमेकोकडून 6-11, 8-11, 9-11 असा पराभव स्वीकारावा लागलाय. तर, मानव ठक्करनं अॅलन कुरमंगलीयेवविरुद्ध 12-10, 11-1, 11-8 असा विजय मिळवलाय. त्यानंतर जी साथियानला डेनिस झोलूदेवकडून 11-6, 5-11, 14-12, 9-11, 6-11 असा पराभव स्वीकारावा लागलाय. दरम्यान, हरमीतनं डेनिसचा 12-10, 11-9, 11-6 असा पराभव करत भारताला विजय मिळवून दिला.
ट्वीट-
World Team Table Tennis Championship
— Sports India (@SportsIndia3) October 3, 2022
India beat Kazakhstan by 3-2 in 3rd group stage game & remain unbeaten. India is currently on top
Sathiyan Gnanasekaran, Harmeet Desai & Manav Thakaar all won match one match. Sathiyan & Harmeet lost one
Last game against France tomorrow pic.twitter.com/KWPIsNJTGq
हे देखील वाचा-