Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Indian boxers win record seven gold medals at Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये 1 जुलै हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे.

Indian boxers win record seven gold medals at Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्स 2026 (Commonwealth Games 2026) मध्ये 1 जुलै हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. भारतीय बॉक्सर्संनी रिंगमध्ये असा काही धुमाकूळ घातला की, अवघ्या 9 तासांच्या अवधीत भारताच्या खात्यात 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी तब्बल 10 पदके जमा झाली. बॉक्सिंगच्या मैदानात सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकून भारत या स्पर्धेत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह भारताने पदकतालिकेत आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशा एकूण 38 पदकांसह चौथ्या स्थानी आहे.
GREATEST DAY EVER FOR INDIAN BOXING 😍 🥊
— Johns. (@CricCrazyJohns) August 1, 2026
🥇 Sachin Siwach
🥇 Preeti Pawar
🥇 Jaismine Lamboria
🥇 Sakshi Chaudhary
🥇 Priya Ghanghas
🥇 Arundhati Choudhary
🥇 Ankush Panghal
🥈 Narender Berwal
🥈 Lovlina Borgohain
🥈 Jadumani Singh
7 GOLD & 3 SILVER IN THE SPACE OF 9 HOURS -… pic.twitter.com/eMrTL6WFFW
प्रवीण चित्रवेलसह अनेक खेळाडूंनी जिंकले रौप्य
भारतासाठी रौप्यपदकांची सुरुवात प्रवीण चित्रवेल याने पुरुषांच्या ट्रिपल जंप स्पर्धेत केली. त्यानंतर बॉक्सिंगमध्ये जादूमणी सिंह याने पुरुषांच्या 55 किलो गटात रौप्यपदक पटकावले. पॅरा अॅथलेटिक्समध्ये शुभम जुयाल याने शॉटपुट प्रकारात रौप्य जिंकून भारताच्या पदकांमध्ये भर घातली. अनुभवी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने महिला 75 किलो गटात रौप्यपदक मिळवले. दिवसातील शेवटच्या बॉक्सिंग अंतिम सामन्यात नरेंदर बेरवाल यालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, जूडोमध्ये उन्नती शर्मा हिने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकसंख्येत आणखी भर घातली.
अंकुश पंघालने पटकावले सुवर्ण
भारतासाठी दिवसातील शेवटचे सुवर्णपदक अंकुश पंघाल याने जिंकले. पुरुषांच्या 80 किलो गटाच्या अंतिम फेरीत त्याने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा 4-1 अशा विभाजित निर्णयाने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. बॉक्सिंगमध्ये भारताचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी सचिन याने पुरुषांच्या 60 किलो गटाच्या अंतिम फेरीत नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग नदेवेलोचा 3-2 अशा विभाजित निर्णयाने पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.
लव्हलिनाला रौप्य, अरुंधतीने जिंकले सुवर्ण
महिला 75 किलो गटाच्या अंतिम सामन्यात लव्हलिना बोरगोहेनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या एम्मा सुई ग्रीनट्री हिच्याशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत एम्माने 4-1 अशा विभाजित निर्णयाने विजय मिळवत लव्हलिनाला रौप्यावर समाधान मानावे लागले. मात्र त्याआधी महिला 70 किलो गटात भारताच्या अरुंधती हिने इंग्लंडच्या चेंटेले रीडचा 5-0 अशा एकमताने निर्णयाने पराभव करत शानदार सुवर्णपदक जिंकले. दिवसाची सुरुवात भारतासाठी सुवर्णमयी ठरली. प्रीती पवार हिने महिला 54 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर जैस्मिन लंबोरिया हिने महिला 57 किलो गटात शानदार कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले. दिवसाचा शेवट अंकुश पंघालच्या सुवर्णपदकाने झाला.
भारताने जिंकली 13 सुवर्णपदके
दिवसाची सुरुवात प्रीती पवारने महिलांच्या 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून केली. त्यानंतर जस्मिन लँबोरियाने महिलांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दिवसाच्या अखेरीस, भारतीय बॉक्सर अंकुश पांघलनेही उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. भारताने या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह एकूण 38 पदके जिंकली आहेत. गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा -






















