एक्स्प्लोर

IND vs WI: शून्यावर बाद होऊनही विराटनं रचला विक्रम, 'ही' कामगिरी करणारा 8वा भारतीय खेळाडू

विशाखापट्टणममध्ये रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28वं शतक साजरं केलं. त्यानं केलेली 159 धावांची खेळी ही यंदाच्या वर्षात वन डेतली सातवी शतकी खेळी ठरली. विराट मात्र शून्यावरच बाद झाला.

विशाखापट्टणम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 400 आंतराष्ट्रीय सामने खेळणारा भारताचा आठवा आणि जगातील 33वा क्रिकेटर बनला आहे. कोहली एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमध्ये बुधवारी दुसरा वनडे सामना खेळण्यास मैदानावर उतरला आणि त्याने आपल्या नावे हा विक्रम केला आहे. श्रीलंकेविरूद्ध 2008मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने आतापर्यंत 241 वनडे, 84 कसोटी सामने आणि 75 टी20 आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोहली आधी सचिन तेंडुलकरने 664, महेंद्रसिंह धोनीने 538, राहुल द्रविडने 509, मोहम्मद अजहरुद्दीनने 433, सौरभ गांगुलीने 424, अनिल कुंबळेने 403 आणि युवराज सिंहने 402 आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहित शर्मानं ठोकलं दीडशतक विशाखापट्टणममध्ये रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28वं शतक साजरं केलं. त्यानं केलेली 159 धावांची खेळी ही यंदाच्या वर्षात वन डेतली सातवी शतकी खेळी ठरली. या कामगिरीसह त्यानं टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. त्या दोघांनी अनुक्रमे 2000 आणि 2016 साली एकाच वर्षात सात शतकं ठोकली होती. एकाच कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त नऊ शतकं ठोकण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 1998 साली सचिननं ही कामगिरी केली होती. दरम्यान, विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाच्या दोन्ही सलामीवीरांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियाने 387 धावांचा डोंगर रचला आहे. रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28वं शतक साजरं केलं. तर लोकेश राहुलनं तिसरं शतक ठोकलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली. या दोघांची शतकं आणि शेवटी श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला. पहिला सामना जिंकलेल्या विंडीज संघासमोर आता मोठे आव्हान आहे. शिमरॉन हेटमायर आणि होपच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकला होता. भारताला मालिकेतील आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात पराभवसाठी भारताची सुमार गोलंदाजी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. संबंधित बातम्या :  INDvsWI 2nd ODI | टीम इंडियाचं विंडीजला 388 धावांचं आव्हान, रोहित, राहुलची शानदार शतकं #ICCAwards : मराठमोळ्या स्मृती मानधनाचा आयसीसीच्या वन डे, ट्वेंटी-20 संघात समावेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget