एक्स्प्लोर

INDvsWI 2nd ODI | टीम इंडियाचं विंडीजला 388 धावांचं आव्हान, रोहित, राहुलची शानदार शतकं

रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28वं शतक साजरं केलं. तर लोकेश राहुलनं तिसरं शतक ठोकलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली. या दोघांची शतकं आणि शेवटी श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला.

विशाखापट्टणम : विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाच्या दोन्ही सलामीवीरांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियाने 387 धावांचा डोंगर रचला आहे. रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28वं शतक साजरं केलं. तर लोकेश राहुलनं तिसरं शतक ठोकलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली. या दोघांची शतकं आणि शेवटी श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला. दुसऱ्या वन-डे सामन्यातही कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पोलार्डचा हा निर्णय यावेळी योग्य ठरला नाही. दोन्ही सलामीवीर रोहित आणि राहुलने दमदार खेळी करत पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली. शतक झळकावल्यानंतर लोकेश राहुल अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने 104 चेंडूत राहुलच्या 102 धावा केल्या. या शतकी खेळीत राहुलने 8 चौकार आणि 3 षटकार ठाकले. यानंतर आलेला विराट शून्यावर बाद झाला. यानंतरही रोहितची फटकेबाजी सुरुच राहिली. त्याने दीडशतक ठोकल्यानंतर तो बाद झाला. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर रोहित माघारी परतला. त्याने 138 चेंडूत 159 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याच्या जोडीला आलेल्या श्रेयस अय्यरने देखील तडकाफडकी खेळी करत अर्धशतक ठोकले. 49 व्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाला. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर शाई होपने अय्यरचा झेल घेतला. श्रेयसने 32 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. ऋषभ पंतने देखील 16 चेंडूत 39 धावांची तडकाफडकी खेळी केली. किमो पॉलच्या गोलंदाजीवर निकोलस पूरनने त्याचा झेल घेतला. शेवटी आलेल्या केदार जाधवने 10 चेंडूत 16 धावा करत भारताची धावसंख्या 387 वर पोहोचवली. पहिला सामना जिंकलेल्या विंडीज संघासमोर आता मोठे आव्हान आहे. शिमरॉन हेटमायर आणि होपच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकला होता. भारताला मालिकेतील आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात पराभवसाठी भारताची सुमार गोलंदाजी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget