Rohit Sharma : हिटमॅन रोहित छोटेखानी धमाका करून बाद अन् विराटची पाया पडून इडन गार्डनवर एन्ट्री! ट्रिपल सेलिब्रेशनसाठी सज्ज
Rohit Sharma : रोहित शर्मा आज 264 ची पुन्हा बरोबरी याच मैदानावर करतो का? असे वाटू लागले होते. मात्र, एक जोरदार फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा सहाव्या षटकात बाद झाला.
कोलकाता : वर्ल्डकपमध्ये सर्वात खतरनाक कामगिरी करत असलेल्या साऊथ आफ्रिकेविरुद्ध आज टीम इंडियाचा महामुकाबला कोलकाच्या इडन गार्डन मैदानावर होत आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यामध्ये सुद्धा रोहित शर्माने आपला मास्टरप्लॅन कायम ठेवत आफ्रिकेच्या गोलंदाजीवर तुटून पडला.
Rohit Sharma dismissed for 40 in 24 balls...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
Yet another positive innings by Rohit, he was going all over South Africa. Unfortunately another 40s for the Hitman, deserved the fifty. pic.twitter.com/jRZX5rKYC5
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे सोपे धुलाई करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. रोहित शर्माने आपल्या छोटेखानी खेळीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या तोंडच पाणी पळवत फलंदाजी केली. त्यामुळे रोहित शर्मा आज 264 ची पुन्हा बरोबरी याच मैदानावर करतो का? असे वाटू लागले होते. मात्र, एक जोरदार फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा सहाव्या षटकात बाद झाला. रोहित शर्माने अवघ्या 24 चेंडू 40 धावा करताना सहा चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी केली.
King Kohli off the mark with his trademark. pic.twitter.com/qDZ2y23MoA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
कोहली मैदानात
रोहित शर्माच्या खेळीचा आदर्श घेत दुसरीकडे शुभमन गिलने सुद्धा आत्मविश्वासाने खेळायला सुरुवात करताना रोहित बाद होताच दुसऱ्या षटकात यानसेनला षटकार ठोकला. त्यामुळे टीम इंडियाचा इरादा स्पष्ट झाला आहे. दरम्यान, या सामन्यामध्ये सर्वाधिक लक्ष हे किंग कोहलीकडे लागून राहिलं आहे. अर्थातच आज किंग कोहली वयाच्या 35 व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्याचबरोबर त्याची बहुप्रतिक्षित अशी 49 वी सेंचुरी आज होते का? याकडेही जगभरातील चाहत्यांचे लक्ष आहे.
King Kohli walking out to bat at the Eden Gardens on his 35th birthday. pic.twitter.com/2K0WgxA6P4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
त्यामुळे आज ट्रिपल सेलिब्रेशनची संधी विराट कोहली देणार का? याकडे लक्ष आहे. कोहलीचा वाढदिवस, टीम इंडियाचा विजय अन् विश्वविक्रमी शतक अशा सेलिब्रेशन मुडमध्ये देश पोहोचला आहे.
Eden Gardens erupting with 'Kohli, Kohli' chants. pic.twitter.com/LRGKynzdQm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
त्यामुळे आज अवघ्या देशाला विराट कोहली हा चान्स देतो का? याकडे आता लक्ष आहे. दरम्यान, इडन गार्डन हे पूर्णतः कोहलीमय झालं असून तब्बल सत्तर हजारांहून अधिक चाहते कोहलीचा मुखवटा घालून मैदानात आहेत. त्यामुळे निळं वादळ मैदानामध्ये अवतरलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या