एक्स्प्लोर

रोहित, यशस्वीकडून षटकार-चौकारांचा पाऊस; बांगलादेशचा कर्णधार चेंडू घेऊन थेट अम्पायरकडे धावला, Video

India vs Bangladesh: सध्या भारतीय संघाने 1 विकेट गमावत 121 धावा केल्या आहेत.

India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने 10 विकेट्स गमावत 233 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या 3 षटकामध्येच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालने (Yashashwi Jaiswal) 51 धावा केल्या. सध्या भारतीय संघाने 1 विकेट गमावत 121 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे केवळ 12 षटकांत भारतीय संघाने या 121 धावा केल्या आहेत. 

डावाच्या पहिल्या षटकामध्ये यशस्वी जैस्वालने (Yashashwi Jaiswal) तीन चौकार लगावले. यानंतर दुसऱ्या षटकात रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्या दोन चेंडूत खणखणीत षटकार टोलावले. पहिल्या 5 षटकांमध्ये भारतीय सलामीवीरांचा आक्रमक फलंदाजी पाहून बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या चेहऱ्याचा रंग उडाला. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडल्यानंतर शांतो थेट अम्पायरकडे गेला आणि त्यांना चेंडू तपासण्याची विनंती केली. शांतोच्या मागणीवरुन अम्पायरने चेंडू तपासला तेव्हा तो व्यवस्थित असल्याचे दिसले. 

रोहित बाद, यशस्वी दमदार अर्धशतक-

यशस्वी जैस्वालने स्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे. यशस्वीने 49 चेंडूत 72 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुभमन गिल 30 धावा करून खेळत आहे. भारताची पहिली विकेट रोहित शर्माच्या रूपाने पडली. रोहित 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. 

सामना कसा राहिला?

27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे खेळ एक तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर लंच ब्रेकनंतर सामना पावसामुळे थांबवण्यात आला. यानंतर पावसामुळे चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही असेच दृश्य पाहायला मिळाले. तिसरा दिवसही एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. आज सामन्यातील चौथा दिवस  बांगलादेशकडून मोमीनूल हकने दमदार शतक ठोकले. मोमीनूल हकने नाबाद 107 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स पटकावल्या. मोहम्मद सिराजने 2, रवीचंद्रन अश्विनने 2, आकाश दीपने 2 विकेट्स घेतल्या. तसेच रवींद्र जडेजाला 1 विकेट मिळाली. दरम्यान, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. 

संबंधित बातमी:

Ind vs Ban: रोहित शर्माचा अफलातून झेल; स्वत:लाही बसला नाही विश्वास, मैदानातील सर्व अवाक, Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAhmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषणMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP MajhaSanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
Embed widget