India vs Australia 2023 World Cup Final : दीड लाखांच्या गर्दीत 'सन्नाटा' करत पॅट कमिन्सनं बोललेला शब्द खराच करून दाखवला!
पहिल्या 10 षटकात 80 धावा कुटल्यानंतर भारतीय धावसंख्येला ब्रेक लागला. त्यानंतर तब्बल 97 चेंडू चौकारासाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर 27व्या षटकात राहुलने चौकार मारत चौकाराची प्रतीक्षा संपवली.
India vs Australia 2023 World Cup Final : टीम इंडियाने गेल्या 10 सामन्यांमध्ये अविश्वसनीय कामगिरी करताना फायनलमध्ये धडक मारली. मात्र, फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया अडखळताना दिसत आहे. टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाले असून पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये ते सुद्धा फायनलमध्ये बॅकफुटवर गेल्याचे दिसून येत आहे.
THE DREAM WORLD CUP ENDS FOR KING KOHLI...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2023
- 765 runs.
- 95.63 average.
- 6 fifties.
- 3 centuries.
- Hundred in Semis.
- Fifty in Final.
An all time great World Cup edition by a player....!!!! 🫡 pic.twitter.com/Q6U4ZsSN5a
या सामन्यांमध्ये नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरली. मात्र, टीम इंडियाची स्थिती 30 षटकात 4 बाद 152 अशी झाली आहे. एका बाजून कोहलीने नांगर टाकत शानदार अर्धशतक झळकावलं. मात्र, दुर्दैवीरित्या विराट कोहली बाद झाल्याने दीड लाख चाहत्यांची निराशा झाली आणि मैदानात एकच सन्नाटा पसरला. त्यामुळे फायनलच्या पूर्वसंख्येला बोलताना दीड लाख जनतेला शांत करण्यात वेगळीच मजा असल्याचे वक्तव्य पॅट कमिन्सनं केलं होते ते खरं करून दाखवलं आहे.
दीड लाख क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सन्नाटा करून टाकू
कमिन्स फायनलपूर्वी शनिवारी बोलताना म्हणाला की, भारत एक चांगला संघ आहे. मोहम्मद शमी हा एक मोठा धोका आहे. दीड लाख क्षमतेच्या स्टेडियममधील गर्दीच्या दबावाबद्दल बोलताना, कमिन्स म्हणाला की खेळात घरच्या संघाला पाठिंबा मिळणे काही नवीन नाही. पण विरोधी संघ असल्याने तुमच्या खेळाने स्टेडियममध्ये शांतता निर्माण करण्यापेक्षा आनंददायी आणि समाधानकारक काहीही असू शकत नाही. हे आमचे ध्येय असणार आहे.
Virat Kohli - 765 runs (95.62 Avg & 90.31 Sr)
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2023
Rohit Sharma - 597 runs (54.27 Avg & 125.94 Sr)
Two of the greatest performances ever, they have bossed World Cup 2023. pic.twitter.com/mVKH3Yy2SF
पॅट कमिन्स पुढे म्हणाला की, आम्ही भारतीय भूमीवर भरपूर क्रिकेट खेळतो. उदाहरणार्थ दीड लाख प्रेक्षकांसमोर खेळणे ही नवीन भावना नाही. परंतु या स्तरावर आपण यापूर्वी जे अनुभवलं आहे त्यापेक्षा ते कदाचित खूप जास्त असेल यात शंका नाही. हा मोठा सामना असणार आहे. काही महान संघांना 1999, 2003, 2007 विश्वचषक चॅम्पियन बनताना पाहिले.
तब्बल 97 बाॅलनंतर चौकार
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट गेल्याने बॅकफूटवर गेल्याचे दिसून आली. पहिल्या 10 षटकात 80 धावा कुटल्यानंतर भारतीय धावसंख्येला ब्रेक लागला. त्यानंतर तब्बल 97 चेंडू चौकारासाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर 27व्या षटकात राहुलने चौकार मारत चौकाराची प्रतीक्षा संपवली. त्यानंतर काही वेळातच कोहली दुर्दैवी बाद झाल्याने मैदानात सन्नाटा पसरला.
इतर महत्वाच्या बातम्या