India Open 2022: कोरोनाचा स्फोट, बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पासह सात जण पॉझिटिव्ह
India Open 2022: हे सर्व खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
India Open 2022: इंडिया ओपन 2022 स्पर्धेत कोरोनाचा स्फोट झालाय. भारताचा बॅटमिंटनपटू किदम्बी श्रीकांत (Kidambi Srikanth) आणि अश्विनी पोनप्पासह (Ashwini Ponnappa) रितिका ठाकेर (Ritika Thaker), ट्रीसा जॉली (Treesa Jolly), मिथुन मंजुनाथी (Mithun Manjunath), सिमरन सिंघी (Simran Singhi) आणि खुशी गुप्ता (Khushi Gupta) या सात जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. हे सर्व खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. ही स्पर्धा 11 जानेवारीपासून सुरू झाली असून 16 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी इंडिया ओपन 2022 स्पर्धेतून माघार घेतलीय. या सर्व खेळाडूंच्या विरोधकांना पहिल्या फेरीत वॉकओव्हर मिळणार आहे. तसेच त्यांना स्पर्धेच्या थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती बॅडमिंटन वर्ल्ड त्यांच्या एका निवेदनाद्वारे दिलीय.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सर्व खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चाचणी प्रोटोकॉल लागू करण्यात आले. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावली. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. तर सायना नेहवाल भाग्यवान ठरली. चेक चेक प्रजासत्ताकच्या तेरेझा स्वाबिकोवाला दुखापत झाल्यानं ती स्पर्धेतून बाहेर झालीय. एचएस प्रणॉयनेही सहज विजयाची नोंद केली. आसामची अश्मिता चलिहानं पहिल्या फेरीत निराशाजनक कामगिरी केली. आजपासून दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे सर्व सामने दिल्लीच्या केडी जाधव हॉल येथे खेळले जाणार आहेत.
हे देखील वाचा-
- Ind vs SA, 3rd Test, 2nd Day Highlights: दुसऱ्या दिवशी भारताची भेदक गोलंदाजी, पण सलामीवीर फेल, दिवसअखेर 70 धावांच्या आघाडीसह दोन गडी बाद
- Ind vs SA, 3rd Test, 2nd Day Highlights: दक्षिण आफ्रिका सर्वबाद, पहिल्या डावात 210 धावांपर्यंत मजल, भारताकडे 13 धावांची आघाडी
- IND vs SA ODI Series : वनडे संघात बदल, दोन खेळाडूंना दिली बीसीसीआयने संधी
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha