(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA ODI Series : वनडे संघात बदल, दोन खेळाडूंना दिली बीसीसीआयने संधी
India vs South Africa ODI Series: 19 जानेवारी 2022 पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्याची मालिका सुरु होणार आहे.
Jayant Yadav & Navdeep Saini Added To ODI Squad: दक्षिण आफ्रिकाविरोधात 19 जानेवारी २०२२ पासून होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने संघात दोन महत्वाचे बदल केले आहेत. फिरकीपटू जयंत यादव आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांचा दक्षिण आफ्रिकाविरोधात भारतीय संघात सहभाग करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी के. एल राहुलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा दक्षिण आफ्रिाकविरोधातील एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्याजागी के. एल. राहुलकडे कर्णधापद सोपवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. तर शिखर धवनचे पुनरागमन झालं आहे.
वाशिंगटन सुंदरचा पत्ता कट -
अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरला बंगळरुमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सुंदरचे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं तिकीट कापण्यात आले. वॉशिंगटन सुंदरच्या जागी जयंत यादवला संधी देण्यात आली आहे. जयंत यादवने ऑक्टोबर 2016 मध्ये एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. जयंत यादव आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे.
नवदीप सैनीला संधी -
दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज जखमी झाला होता, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात सिराजला आराम देण्यात आला आहे. सिराजची दुखापत कितपत गंभीर आहे, हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळेच बीसीसीआयने सिराजचा बॅकअप म्हणून नवदीप सैनीला निवडण्यात आले आहे.
कसा आहे भारतीय संघ -
के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी
NEWS - Jayant Yadav & Navdeep Saini added to ODI squad for series against South Africa.
— BCCI (@BCCI) January 12, 2022
More details here - https://t.co/NerGGcODWQ #SAvIND pic.twitter.com/d14T9j3PgJ
तीन सामन्याच्या कोसोटी मालिकेनंतर भारत दक्षिण आफ्रिकाविरोधात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 19 जानेवारी रोजी भारताच्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...
एकदिवसीय सामने
19 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
21 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
23 जानेवारी 2022 - न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन - दुपारी दोन वाजता