(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND Vs ENG 2nd T20I Women Cricket: महिला T20 सामन्यात भारताकडून इंग्लंडचा पराभव, स्मृती मंधानाची तुफानी खेळी
IND Vs ENG 2nd T20I Women Cricket: या सामन्यात स्मृती मंधानाची तुफानी खेळी पाहायला मिळाली, जिच्या जोरावर भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
IND Vs ENG 2nd T20I Women Cricket : पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धचा (IND Vs ENG) दुसरा टी-20 सामना जिंकला. भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडने 6 गडी गमावून 142 धावा केल्या. तर भारतीय संघाने 2 गडी गमावून 146 धावा करून सामना जिंकला. या सामन्यात स्मृती मंधानाची तुफानी खेळी पाहायला मिळाली, जिच्या जोरावर भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
India win the second IT20 and level the series in Derby. pic.twitter.com/n4KllnjCaQ
— England Cricket (@englandcricket) September 13, 2022
भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात 9 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेत आपले अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 142 धावा केल्या. इंग्लंडच्या फ्रेया केम्पने 51 धावा केल्या, तर मायिया बाउचियरने 34 धावा केल्या. या दोघींशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने खास खेळ दाखवला नाही. भारताकडून स्नेह राणाने तीन, तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
स्मृती मंधानाची तुफानी खेळी
143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, शेफाली वर्मा 20 धावा करून बाद झाली, तोपर्यंत पॉवरप्लेमध्ये संघाच्या 55 धावा झाल्या होत्या. भारताची दुसरी विकेट 77 धावांवर पडली, जेव्हा दयालन हेमलता 9 धावांवर बाद झाली. यानंतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात भागीदारी होत संघाने 16.4 षटकांत लक्ष्य गाठले.
मंधाना ठरली सामनावीर
स्मृती मंधाना म्हणाली, मागील सामन्यानंतर आम्हाला मजबूत पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधायची होती. रॅश शॉट खेळू नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. एक सलामीवीर म्हणून बाहेर जाता आणि तुमच्या संघाला चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. यात मला योगदान देता आले याबद्दल आनंद आहे
हे देखील वाचा-