एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स कोणी-कोणी घेतल्यात? टॉप 10 मध्ये आश्विनशिवाय एकही भारतीय नाही

ICC T20 World Cup 2022 : यंदा ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी आतापर्यंतच्या म्हणजेच 2007 पासून ते 2021 पर्यंतच्या विश्वचषकातील काही खास गोलंदाजी संबंधित रेकॉर्डस जाणून घेऊ...

T20 World Cup Record : आयसीसी टी20 2022 विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup 2022) 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे पार पडत आहे. आगामी विश्वचषकासाठी जवळपास बहुतांश सर्व देशांनी आपले संघ जाहीर केले असून बीसीसीआयकडूनही नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली. यावेळी संघात बुमराह आणि हर्षल परतल्याने भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे म्हणा... पण नेमकी भारतीय गोलंदाजी कशी कामगिरी करेल हे विश्वचषकच ठरवेल. तर यंदाच्या विश्वचषकाआधी टी20 वर्ल्डकपमधील गोलंदाजी रेकॉर्ड्सचा विचार केला तर टॉप 10 मध्ये केवळ एक भारतीय आहे तो म्हणजे आर. आश्विन (R Ashwin). आश्विन यंदाच्या टी20 स्कॉडमध्येही असल्यानं त्याच्याकडून यंदाही संघाला अपेक्षा असतील. तर आतापर्यंतच्या म्हणजेच 2007 पासून ते 2021 पर्यंतच्या टी20 विश्वचषकांच्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू कोण? ते पाहूया...

तर या यादीत एक नंबरला असणारा खेळाडू हा फुलटाईम बोलर नसून एक अष्टपैलू क्रिकेटर शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) हा आहे. पहिल्या विश्वचषकापासून म्हणजेच 2007 पासून 2021 चाही विश्वचषक खेळलेल्या शाकिबनं 31 सामन्यातील 30 डावांत 6.43 च्या इकॉनॉमीनं 41 विकेट्स नावावर केले आहेत. तो या यादीत अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या नंबरवर पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटर शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) असून त्याने 2007 पासून ते 2016 पर्यंत 34 सामन्यातील 31 डावात  6.71 च्या इकॉनॉमीनं 39 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या नंबरवर श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) असून त्याने 31 सामन्यातील 31 डावांत 7.43 च्या इकॉनॉमीनं 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर सईद अजमल, मेन्डीस, उमर गुल, डेल स्टेन, स्टुवर्ट ब्रॉड, डीजे ब्राव्हो यांच्यासह10 व्या स्थानी रवीचंद्रन आश्विन याचा नंबर लागतो.

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-10 गोलंदाज:

क्रमांक गोलंदाजांचं नाव संघ सामने विकेट्स
1 शाकीब अल् हसन बांग्लादेश 31 41
2 शाहीद आफ्रिदी पाकिस्तान 34 39
3 लसिथ मलिंगा श्रीलंका 31 38
4 सईद अजमल पाकिस्तान 23 36
5 अजंता मेंडिस श्रीलंका 21 35
6 उमर गुल पाकिस्तान 24 35
7 डेल स्टेन दक्षिण आफ्रिका 23 30
8 स्टुवर्ट ब्रॉड इंग्लंड 26 30
9 डीजे ब्राव्हो वेस्ट इंडीज 34 27
10 आर. आश्विन भारत 18 26

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget