एक्स्प्लोर

Ind vs Pak Asia Cup Final 2025: पाकिस्तानची आयसीसीकडे आणखी एक तक्रार; आता थेट अर्शदीपचं नाव घेतलं, फायनलआधी राडा, नेमकं काय घडलं?

PCB Files Complaint Against Arshdeep Singh: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र या अंतिम सामन्याआधी पाकिस्तानची पुन्हा रडारड सुरु झाली आहे. 

PCB files complaint against Arshdeep Singh: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak Final 2025) यांच्यात आज (28 सप्टेंबर) आशिया चषकाचा (Asia Cup 2025) अंतिम सामना रंगणार आहे. रात्री 8 वाजता भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला सुरुवात होईल. मात्र या अंतिम सामन्याआधी पाकिस्तानची पुन्हा रडारड सुरु झाली आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगविरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल (PCB files complaint against Arshdeep Singh) केली आहे. अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) अश्लील हावभाव केल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आयसीसीकडून अर्शदीपवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, याआधी देखील पाकिस्तानकडून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध (Suryakumar Yadav) तक्रार दाखल करण्यात आली होती.

पाकिस्तानने अर्शदीप सिंगवर कोणते आरोप केले? (PCB files complaint against Arshdeep Singh)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शदीप सिंगविरुद्ध ज्या घटनेबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे, ती घटना 21 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यादरम्यान घडली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानूसार, अर्शदीप सिंगने त्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले. अर्शदीप सिंगने सदर कृत्य करुन आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी अर्शदीप सिंगवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे. दरम्यान, अर्शदीप सिंगपूर्वी पीसीबीनेही सूर्यकुमार यादवविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पीसीबीने आपल्या तक्रारीत भारतीय कर्णधारावर क्रिकेटचे राजकारण करण्याचा आणि आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता.

बीसीसीआयच्या तक्रारीनंतर हारिस रौफला शिक्षा- (ICC Punishes Haris Rauf)

बीसीसीआयनेही हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्याबाबत आयसीसीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आयसीसीने हारिस रौफला मॅची फीच्या 30 टक्के दंड ठोठावला होता.  तर साहिबजादाला वॉर्निंग देण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय? (Arshdeep Singh Video)

आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 21 सप्टेंबर रोजी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. भारतविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ भारतीय फलंदाजांना वारंवार चिथवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच दुसऱ्या डावात म्हणजेच भारत जेव्हा फलंदाजी करत होता, त्यादरम्यानचा एक व्हिडीओ देखील समोर आला. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मैदानात फलंदाजी करत असताना मैदानातील प्रेक्षकांना हाताने एअरक्राफ्ट पाडल्याची अ‍ॅक्शन करुन डिवचत होता. या हारिस रौफला भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही प्रत्युत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तानचा सामना संपल्यानंतरचा अर्शदीप सिंगचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओद्वारे अर्शदीपने हारिफ रौफने केलेल्या अॅक्शनवर प्रत्युत्तर दिलं होतं. 

View this post on Instagram
 
A post shared by cricket news (@cricket.exploser)

संबंधित बातमी:

Wasim Akram Prediction On Ind vs Pak: आशिया चषक कोण जिंकणार, भारत की पाकिस्तान?; वसीम अक्रमने लगेच नाव सांगितले!

IND vs PAK Asia Cup Final 2025: भारत-पाकिस्तानच्या अंतिम सामन्यापूर्वी दुबईने कडक नियम अन् कायदे केले लागू;आता मैदानात...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget