एक्स्प्लोर
राजकोट कसोटीत पहिल्या दिवशी इंग्लंड सुस्थितीत, ज्यो रुटचं शतक
राजकोट : राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडनंच वर्चस्व गाजवलं. या सामन्यात इंग्लंडच्या ज्यो रुटनं शतक झळकावलं तर मोईन अलीही शतकाच्या उंबरठ्यावर आहे.
दोघांच्या शानदार फलंदाजीमुळे इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर चार बाद 311 धावांची मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मोईन अली 99 धावांवर आणि बेन स्टोक्स 19 धावांवर खेळत होता.
त्यापूर्वी ज्यो रुटनं 180 चेंडूंत 124 धावांची खेळी रचली. रुटचं हे कसोटी कारकीर्दीतलं अकरावं शतक ठरलं. रुटनं मोईन अलीच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 179 धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या डावाला आकार दिला.
इंग्लंडकडून हसीब हमीदनं 31 आणि अॅलेस्टर कूकनं 21 धावांची खेळी केली. भारताकडून आर. अश्विननं दोन, तर उमेश यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी एकेक विकेट काढली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement