एक्स्प्लोर

IND v ENG 3rd Test Match: आजपासून भारत-इंग्लंड डे-नाईट कसोटी सामना, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पहिलावहिला आंतररराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार आहे.

IND v ENG 3rd Test Match : भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात होत आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतली ही कसोटी दिवसरात्र खेळवण्यात येत आहे. या स्टेडिअमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. गृहमंत्री अमित शाह आणि बीसीसीआयचे अनेक अधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहे.

भारतानं चेन्नईची दुसरी कसोटी जिंकून या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा अहमदाबादमध्ये कारकिर्दीतल्या कसोटी सामन्यांचं शतक साजरं करणार आहे. भारत-इंग्लंड संघांमधली तिसरी कसोटी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये कपिलदेव सर्वाधिक 131 कसोटी सामन्यांमध्ये खेळला असून, त्याखालोखाल ईशांतच्या नावावर 99 कसोटी आहेत.

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं अहमदाबादच्या मोटेराचे स्टेडियममध्ये पहिलावहिला आंतररराष्ट्रीय सामना खेळवण्यात येईल. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता एक लाख दहा हजार असून, कोरोनामुळं तिसऱ्या कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्‍या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे.

मोटेराचे स्टेडियम नव्यानेच तयार केले आहे. आतापर्यंत येथे फक्त काही टी -20 सामने खेळले गेले आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टी 20 सामन्यात फक्त 40 षटकांचा खेळ होतो आणि त्यानुसार खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज लावणे कठीण असते.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 26 February 2025Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
Embed widget