IND vs ENG 2nd Test 1stDay : शतकवीर यशस्वी जैस्वाल साहेबांविरोधात दिवसभर एकटाच लढला; टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी
IND vs ENG 2nd Test 1stDay : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले.
IND vs ENG 2nd Test 1stDay : टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची हाराकिरी दुसऱ्या कसोटीतही सुरुच राहिली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 6 विकेटवर 336 पर्यंत पोहोचली. विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नावावर राहिला. यशस्वी जैस्वालने 257 चेंडूत 179 धावा करून नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत 17 चौकार आणि 5 षटकार मारले. शोएब बशीर आणि रेहान अहमद यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. याशिवाय जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि रवी अश्विन नाबाद परतले.
Yashasvi Jaiswal said, "I want to play till the very end for my team. Hopefully I'll make double of it". pic.twitter.com/OhHz5oCNHG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 2, 2024
पहिला दिवस यशस्वी जैस्वालच्या नावावर
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. पण यशस्वी जैस्वाल एका बाजूने डाव सांभाळला. भारतीय संघाला पहिला धक्का 40 धावांवर बसला. कर्णधार रोहित शर्मा 14 धावा करून बाहेर पडला. यानंतर शुबमन गिल 34 धावा करून जेम्स अँडरसनचा बळी ठरला. तर श्रेयस अय्यरने 27 धावा केल्या. श्रेयस अय्यरला टॉम हार्टलेने बाद केले. रजत पाटीदार 32 धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.
India 336/6 on Day 1 Stumps.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 2, 2024
Yashasvi Jaiswal the hero of the day with 179* (257). He deserves a double century tomorrow, a knock to remember when everyone else couldn't make it count. pic.twitter.com/hZz2EFJXpu
टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतले
भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, परंतु टीम इंडियाचे फलंदाज चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरले. टीम इंडियाचा अष्टपैलू अक्सर पटेल 27 धावा करून बाद झाला. शोएब बसीरने त्याला बाद केले. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत 17 धावा करून रेहान अहमदच्या चेंडूवर बाद झाला.
Rohit - 14(41)
— Johns. (@CricCrazyJohns) February 2, 2024
Gill - 34(46)
Iyer - 27(59)
Patidar - 32(72)
Axar - 27(51)
Bharat - 17(23)
But then one & only Jaiswal with 179* from 257 balls on Day 1. 🦁 pic.twitter.com/fJSSaom1w7
इतर महत्वाच्या बातम्या